केएल राहुलचं पूर्ण नाव महित आहे? ठेवायचं होतं 'हे' नाव, वडिलांच्या चुकीमुळे बदललं

KL Rahul Name : आयसीसी विश्वचषकात टीम इंडियाने दमदार कामगिर केलीय. भारताच्या टॉप 5 फलंदाजांनी संपूर्ण स्पर्धेत अडिज  हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. यात भारताचा मधल्या फळीतील स्टार फलंदाज केएल राहुलचंही मोठं योगदान आहे. 

राजीव कासले | Updated: Nov 19, 2023, 04:16 PM IST
केएल राहुलचं पूर्ण नाव महित आहे? ठेवायचं होतं 'हे' नाव, वडिलांच्या चुकीमुळे बदललं title=

KL Rahul Name : आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धेत टीम इंडियाच्या टॉपच्या पाच फलंदाजांनी आतापर्यंत तब्बल 2523 धावा केल्या आहेत. टीम इंडियाच्या  (Team India) टॉप फलंदाजांची कामगिरी राहिली तर विराट कोहली, रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, केएल राहुल आणि शुभमन गिल यांची कामगिरी जबरदस्त झालीय. गिल वगळता चारही फलंदाजांनी शतक ठोकलंय. यात केएल राहुलची (KL Rahul) योगदानही मोलाचं ठरलंय. नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात केएल राहुलने खणखणीत शतक झळकावलं. 

राहुलच्या नावाची फिल्मी स्टोरी
केएल राहुलच्या नावाची स्टोरी एखाद्या चित्रपटाच्या कथेला साजेशी अशी आहे. केएल राहुलच पूर्ण नाव कनानूर लोकेश राहुल (Kannur Lokesh Rahul) असं आहे. वास्तविक केएल राहुलचे वडिल डॉ. केएन लोकेश हे टीम इंडियाचे महान फलंदाज लिटिल मास्टर सुनील गावसकर यांचे खूप मोठे फॅन होते. मुलगा झाला तर त्याचं नाव सुनील गावसकरच्या मुलाच्या नावावर ठेवायचं हे त्यांनी आधीच मनाशी ठरवून ठेवलं होतं. सुनील गावसकर यांच्या मुलाचं नाव रोहन आहे. आपल्या मुलाचं नावही ते रोहनचं ठेवणार होते. पण बारश्याला ते रोहन नाव विसरले आणि सुनील गावसकर यांच्या मुलाचं नाव राहुल आहे समजून त्यांनी मुलाचं नाव राहुल ठेवलं. आज हेच नाव जगभरात प्रसिद्ध झालंय.

केएल राहुलचं कुटुंब
केएल राहुलचं संपूर्ण कुटुंब उच्चशिक्षित आहे. त्याचे वडिल केएन लोकेश एनआईटीमध्ये प्रोफेसर आहे. तर आई राजेश्वरी लोकेश या युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मंगलोरमध्ये लेक्चरर आहेत. केएल राहुलचा जन्म 18 एप्रिल 1992 मध्ये कर्नाटकातील मंगलोरमध्ये झाला. लहानपणापासूचन केएल राहुलला क्रिकेट खेळाची आवड होती. वडीलांप्रमाणेच केएल राहुलचे आवडते क्रिकेटपटू सुनील गावसकर होते. त्यांच्यासारखच देशासाठी खेळण्याचं स्वप्न तो बाळगून होता. आपला मुलगा सुनील गावसकर सारखा खेळावा असं त्याच्या वडीलांना वाटत असे. त्यामुळे प्रत्येक पावलावर त्यांनी केएल राहुलला पाठिंबा दिला. 

केएल राहुलची क्रिकेट कारकिर्द
केएल राहुलने 11 जून 2016 ला झिम्बाब्वेविरुद्ध आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तर 26 डिसेंबर 2014 ला आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. केएल राहुलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 71 सामन्यात 2677 धावा केल्यात. यात सात शतकांचा समावेश आहे. तर 47 कसोटी सामन्यात 2642 धावा केल्यात, एकदिवसीय क्रिकेटमध्येही राहुलने 7 शतकं केली आहेत. तर 72 टी20 सामन्यात राहुलने 2 शतकं ठोकलीत. आयपीएलमध्ये केएल राहुल लखनऊ जायंटसचं प्रतिनिधित्व करतो. किंग्स इलेव्हन पंजाब आणि सनराईजर्स हैदराबाद संघाकडूनही तो खेळला आहे.