संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणात आरोपींवर कारवाई करण्यासाठी भाजप आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडसह त्यांच्या साथीदारांवर धसांनी आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. मात्र आता राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब आजबे यांनी थेट धस यांच्यावरच वाल्मिकशी संबंध असल्याचे आरोप केले आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरण लावून धरणारे भाजपचे आमदार सुरेश धसांवरच आरोप करण्यात आले आहेत. धस यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे मैदानात उतरले आहेत. आजबे यांनी धसांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. खंडणी आणि हत्या प्रकरणात ज्या वाल्मिक कराडला मकोका खाली अटक करण्यात आली आहे. त्याच वाल्मिकने विधानसभा निवडणुकीत धसांचं काम केल्याचा आरोप बाळासाहेब आजबे यांनी केला आहे. आकाचे आणि धसांचे व्यवहार झालेत ते तपासले पाहिजेत असं म्हणत आजबे यांनी खळबळ उडवून दिली आहे.
देवस्थानच्या जमिनी आणि गोरगरिबांच्या जमिनी लाटल्याचे आरोपही बालासाहेब आजबे यांनी सुरेश धस यांच्यावर केला आहे. मागील 2 महिन्यांपासून आष्टी मतदारसंघातील कामांकडे आमदार सुरेश धस यांचं लक्ष नाही. मतदारसंघातील काम ठप्प असल्याचा आरोपही आजबे यांनी केला आहे.
राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब आजबे यांनी सुरेश धस यांनी गंभीर आऱोप केले आहेत. आधीच धनंजय मुंडेंची भेट घेतल्यानं धस टीकेचे धनी झाले होते. त्यात आता आजबेंनी केलेल्या आरोपांची भर पडली आहे. आता या आरोपांवर सुरेश धस काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.