Baba Vanga Predictions: बाबा वेंगा हे जगातील प्रसिद्ध ज्योतिषांपैकी एक आहेत. बाबा वेंगाने अनेक भाकिते केली आहेत, त्यापैकी काही खरी ठरल्याचा दावा केला जातो. बाबा वेंगा यांनी 2025 सालासाठी एक मोठी भविष्यवाणी देखील केली आहे.मार्च महिना एका दिवसानंतर सुरु होणार आहे. मार्च महिना भारतासाठी कसा असेल. तसेच या महिन्याचा 12 राशींवर काय परिणाम होईल यावर बाबा वेंगा यांनी भविष्य केलं आहे.
फेब्रुवारी महिना आता संपत आला आहे आणि लवकरच मार्च महिना सुरू होणार आहे. बाबा वेंगा यांनी आधीच भाकीत केले होते की मार्च-एप्रिल 2025 आणि त्यानंतरच्या दोन महिन्यांत काही रहस्यमय घटना घडू शकतात. बाबा वेंगा यांनी त्यांच्या आयुष्यातील काही भविष्यातील भाकिते तपशीलवार सांगणारे एक पुस्तक देखील प्रकाशित केले आहे. या पुस्तकानुसार, बाबा वेंगा यांनी म्हटले आहे की, 2025 मध्ये जगावर एक मोठे संकट येऊ शकते.
बाबा वेंगाच्या भाकितानुसार, मार्च-एप्रिलमध्ये ग्रहांच्या स्थितीत काही बदल होतील. या बदलाचा परिणाम काही राशींसाठी नकारात्मक तर काहींसाठी सकारात्मक असेल. मेष, मिथुन, कर्क, वृषभ आणि कुंभ राशींचे भविष्य पुढील दोन महिन्यांत उज्ज्वल असेल. या राशीचे लोक या दोन महिन्यांत लॉटरी जिंकू शकतात. या काळात या राशींच्या लोकांची अनेक स्वप्ने सत्यात उतरू शकतात, असे भाकीत केले आहे.
दरम्यान, बाबा वेंगा यांनी ज्याप्रमाणे सकारात्मक भाकिते केली आहेत, त्याचप्रमाणे त्यांनी काही नकारात्मक भाकिते देखील केली आहेत, ज्याबद्दल बाबा वेंगा म्हणाले आहेत की ते मार्च 2025 पासून सुरू होईल. बाबा वेंगा यांनी असेही म्हटले आहे की, मार्च-एप्रिल दरम्यान पूर्वेकडील देशांमध्ये पुन्हा एकदा सत्तासंघर्ष सुरू होईल आणि त्याचा परिणाम पश्चिमेकडील देशांवरही होऊ शकतो.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)