राज ठाकरे यांनी मराठी गौरव भाषा दिनानिमित्त दादर येथे विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात रितेश देशमुख यांनी स्टेजवर सगळ्यांसमोर हात जोडून माफी मागितली.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त दादर येथील शिवाजी पार्क येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 'अभिजात' पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होते. या कार्यक्रमात सगळ्यांनी कविता सादर केल्या. यावेळी रितेश देशमुख यांनी भर कार्यक्रमात राज ठाकरे यांची माफी मागितली, नेमकं असं काय घडलं?
या कार्यक्रमाची सुरुवात राज ठाकरे यांच्या भाषणानंतर एका कवितेने झाली. भाषण सादर करत असताना राज ठाकरे यांनी आता थोड्याच वेळात रितेश देशमुख आणि विक्की कौशल उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं. त्याचवेळी रितेश देशमुख राज ठाकरे यांच्या मागे बसलेले दिसले. त्यावेळी रितेशने राज ठाकरे यांच्याकडे बघून हात जोडून माफी मागितली. घड्याळाकडे हात दाखवत आपल्याला उशिर झाल्याचं देखील सांगितलं.
रितेश देशमुखने या कार्यक्रमात वैभव जोशी यांची "जय हे '' ही कविता सादर केली. या कवितेचं सादरीकरण करताना रितेश देशमुखने मान्यवरांचे आभार मानत आपण कवी नाही. त्यामुळे कविता सादर करण्याचा हा पहिलाच अनुभव असल्याच सांगितलं. रितेश देशमुख लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित सिनेमा करणार आहे. यामध्ये तो छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे.
या कार्यक्रमा आशा भोसले, जावेद अख्तर, अशोक सराफ, विक्की कौशल, आशुतोष गोवारीकर, रितेश देशमुख, महेश मांजरेकर, रितेश देशमुख, लक्ष्मण उतेकर, सोनाली बेंद्रे यांच्यास अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. यावेळी मान्यवरांनी कविता वाचन केलं. यावेळी विक्की कौशलने कुसुमाग्रजांची 'कणा' ही कविता सादर केली.
या कार्यक्रमाची सुरुवात राज ठाकरे यांचे सुरुवातीचे भाषण आणि त्यानंतर कविता सादर केली. बाबासाहेब पुरंदरे लिखित 'राजाशिव छत्रपती' यामधील हे काव्य आहे. 'कोण तू रे, कोण तू?'