बायकोचं शिर हातत घेवून गावभर फिरला आणि.... माथेफिरुचे थरकाप उडवणारे कृत्य पाहून पोलिसही हादरले

 एका माथेफिरुने आपल्या पत्नीची कोयत्याने सपासप वार करुन हत्या केली. यानंतर बायकोचं शिर हातत घेवून तो गावभर फिरला.  या माथेफिरुचे थरकाप उडवणारे कृत्य पाहून पोलिसही हादरले आहेत. या घटनेमुळे गावात एकच खबळबळ उडाली. 

Updated: Nov 30, 2022, 09:20 PM IST
बायकोचं शिर हातत घेवून गावभर फिरला आणि.... माथेफिरुचे थरकाप उडवणारे कृत्य पाहून पोलिसही हादरले

गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी : परभणी(Parbhani) येथे एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका माथेफिरुने आपल्या पत्नीची कोयत्याने सपासप वार करुन हत्या केली. यानंतर बायकोचं शिर हातत घेवून तो गावभर फिरला.  या माथेफिरुचे थरकाप उडवणारे कृत्य पाहून पोलिसही हादरले आहेत. या घटनेमुळे गावात एकच खबळबळ उडाली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे(Crime News).  पुर्णा तालुक्यातील कमलापुर येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. पतीने पत्नीचे शीर धडावेगळ केल्याच्या घटनेने गावात थरकाप उडाला आहे. केशव मोरे असे या माथेफिरुचे नाव आहे.

केशव मोरे याने स्वतःच्या पत्नीच शीर सपासप कोयत्याचे वार करून वेगळं केल्याची भयावह घटना समोर आली आहे. कोयत्याने पत्नीचा चेहरा विद्रुप करत तिचे शिर त्याने धडावेगळे केले. त्यानंतर पत्नीचे मुंडके हातात घेत आरोपी पती घरासमोर फिरत होता. यापूर्वी घरात पाळलेल्या मांजरीचे ही त्याने कोयत्याने तुकडे केल्याचे बोलल्या जात आहे. मृत पत्नीचे नाव अशामती केशव मोरे असं आहे. 

अशामती आणि पती केशव मोरे यांच कॉनॉलला सुटलेलं पाणी ऊसाला देण्यावरून वाद झाला. यातून रागावलेल्या पतीने क्रूर पद्धतीने पत्नीच्या मानेवर डोक्यात, चेहऱ्यावर कोयत्याने घाव घालून शीर तोडले, एका हातात कोयता आणि दुसऱ्या हातात शीर घेऊन क्रूर पती घरासमोरील रस्त्यावर फिरत होता. 

व्यंकटी गोविंद मोरे यांनी दिलेल्या तक्रारी वरून ताडकळस पोलीस ठाण्यात पती केशव मोरे विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक आर रागसुधा यांनीं ताडकळस पोलीस ठाण्याला भेट देत गुन्ह्याची माहिती घेतली.
आरोपी केशव मोरे हा मनोरुग्ण असुन रात्री बेरात्री तो वानरांचे आवाज काढायचा. मध्यरात्री पोहयलाच जायचा,तर अनेकांच्या अंगावर धावून जायचा. काही दिवसांपूर्वीच त्याने घरात पाळलेल्या मांजरीचे ही तुकडे केले होते. मंगळवारी आरोपी कमलापूर वरून 15 किमी दूर असलेल्या परभणीला पैदल चालत आला होता आणि पुन्हा परभणी वरून कमलापूरला पैदलच चालत गेला होता अशी माहिती कमलापूर येथील ग्रामस्थांनी बोलतांना दिली.