कोहली आणि मॅक्सवेलमध्ये गोंधळ, विनाकारण गमवाली विकेट, पाहा व्हिडीओ

विराट कोहलीच्या चुकीमुळे मॅक्सवेल OUT? मॅचमध्ये नेमकं काय घडलं पाहा व्हिडीओ 

Updated: May 5, 2022, 03:28 PM IST
कोहली आणि मॅक्सवेलमध्ये गोंधळ, विनाकारण गमवाली विकेट, पाहा व्हिडीओ

मुंबई : आयपीएलमध्ये 49 वा बंगळुरू विरुद्ध चेन्नई सामना पार पडला. पुण्यात झालेल्या सामन्यात महेंद्रसिंह धोनीच्या टीमला 13 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. बंगळुरू टीमने विजयोत्सव साजरा केला. या सामन्यात मॅक्सवेल आणि कोहली दोघंही गोंधळल्याचं पाहायला मिळालं. 

बंगळुरू टीमने खूप छोट्या छोट्या चुका केल्या. विराट कोहलीमुळे ग्लॅन मॅक्सवेल आऊट झाल्याची चर्चा आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कोहलीमुळे मॅक्सवेल आऊट झाल्याची चर्चा सुरू आहे.

बंगळुरूच्या बॅटिंगच्या 9 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. त्यावेळी रविंद्र जडेजा बॉलिंगसाठी मैदानात उतरला. विराट कोहलीने शॉट खेळला आणि रन काढण्याचा कॉल घेतला. मात्र मॅक्सवेल आणि कोहली एकक्षण गोंधळले. त्यामुळे रन काढायला उशीर झाला आणि मॅक्सवेल रनआऊट झाला. 

या गोंधळाचा परिणाम मॅक्सवेलवर झाला. त्याला तंबुत परतावं लागलं. रॉबिन उथप्पाने थ्रो केलेला बॉल धोनीच्या हातात आला आणि त्याने रनआऊट केलं. मॅक्सवेल 22 धावा करून तंबुत परतला. 

रनआऊटचा व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लीक करा

बंगळुरूने 173 धावा केल्या. तर चेन्नईला लक्ष्याचा पाठलाग करताना 160 धावा करता आल्या. सामना गमवल्यानं चेन्नईचे प्लेऑफमध्ये जाण्याचे चान्सेस कमी झाले आहेत. तर याचा फायदा बंगळुरूला झाला आहे.