मित्राच्या रिसॉर्टसाठी सचिनने मागितली संरक्षणमंत्र्यांकडे मदत

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने थेट संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्याकडे मदत मागितली आहे. मसुरीतील लॅण्डोर येथे लष्करी छावणीच्या परिसरात संजय नारंग यांचे रिसॉर्ट आहे. हे रिसॉर्ट डीआरडीओच्या कचाट्यात सापडले आहे.

Updated: Jul 19, 2016, 03:08 PM IST
मित्राच्या रिसॉर्टसाठी सचिनने मागितली संरक्षणमंत्र्यांकडे मदत

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने थेट संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्याकडे मदत मागितली आहे. मसुरीतील लॅण्डोर येथे लष्करी छावणीच्या परिसरात संजय नारंग यांचे रिसॉर्ट आहे. हे रिसॉर्ट डीआरडीओच्या कचाट्यात सापडले आहे.

संजय नारंग हे सचिनचे मित्र आणि व्यावसायिक भागिदार आहेत. रिसॉर्टचे बांधकाम करताना नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सचिनने पर्रिकर यांची भेट घेऊन प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. पण डीआरडीओच्या संवेदनशील प्रकरणात संरक्षण मंत्री लक्ष घालणार नसल्याचे साऊथ ब्लॉकच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.