राज्याच्या आगामी विकासाची दिशा दाखवणारा अर्थसंकल्प - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्याच्या आगामी विकासाची दिशा दाखवणारा अर्थसंकल्प -  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Updated: Mar 11, 2022, 03:56 PM IST
राज्याच्या आगामी विकासाची दिशा दाखवणारा अर्थसंकल्प -  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे title=

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget) सादर केला. राज्याच्या विकासाचा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांनी दिली आहे.

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी राज्याच्या आगामी विकासाची दिशा दाखवणारा अर्थसंकल्प मांडला आहे. गेली दोन वर्ष वेगवेगळ्या संकटांना तोंड देत, राज्याचा विकास पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. आजचा हा अर्थसंकल्प विकासाच्या दिशेने टाकलेलं पुढचं पाऊल आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

जे जे काही शक्य आहे ते आम्ही करत आहोत. आणि यापुढे सुद्धा करणार आहोत, हे आजच्या अर्थसंकल्पातून सूचित होत आहे. मी ठामपणे सांगू इच्छितो राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी मांडलेला हा अर्थसंकल्प हा आपल्या सर्वांच्या साक्षीने जनतेसाठी, आपल्या राज्यातील सर्व माता, भगिणींचा विकास करणारा आणि त्यांना आधार देणारा आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.