Bank Holiday: मे महिन्यात वेगवेगळे सणांमुळे 12 दिवस बँका बंद

पण जर तुमचे काही बँकेत महत्वाचे काम असेल तर, ते लवकरात लवकर पूर्ण करा. मे महिन्यात जवळपास 12 दिवस बँका बंद राहणार आहेत.

Updated: Apr 26, 2021, 10:22 PM IST
Bank Holiday: मे महिन्यात वेगवेगळे सणांमुळे 12 दिवस बँका बंद title=

मुंबई : कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्ण संख्यामुळे बँकांमधील लोकांची गर्दी कमी झाली आहे. पण जर तुमचे काही बँकेत महत्वाचे काम असेल तर, ते लवकरात लवकर पूर्ण करा. मे महिन्यात जवळपास 12 दिवस बँका बंद राहणार आहेत. 1 मे रोजी महाराष्ट्र दिवस किंवा कामगार दिन आहे. या दिवशी काही राज्यांच्या बँका बंद राहतील. त्याचबरोबर 2 मे रोजी रविवार असल्याने बँका बंद राहतील.

देशातील वेगवेगळ्या राज्यांतील बँकांसाठी वेगवेगळे नियम

आरबीआयच्या वेबसाइटनुसार, मे मध्ये एकूण 5 दिवस बँके हॅालिडे आहे. आरबीआयच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या सुट्यांच्या यादीमधील काही सुट्या राज्यांच्या स्थानिक संदर्भानुसार बँकांना दिल्या जातात.

या दिवशीही कोणतेही काम होणार नाही

बँके हॅालिडेशिवाय महिन्याच्या दुसरा आणि चौथा शनिवार 8 आणि 22 मे रोजी आहे. या दिवशी बँकांमध्ये कोणतेही काम होणार नाही. याशिवाय 2, 9, 16, 23 आणि 30 मे रोजी रविवार आहे.

बँका केवळ 4 तासांसाठी उघडतात

देशातील कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता बँक युनियन, इंडियन बँक असोसिएशनने (आयबीए) सल्ला दिला आहे की, बँका फक्त सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत उघडल्या पाहिजेत. म्हणून बँका केवळ 4 तास सार्वजनिक कामांसाठी उघडे रहाणार आहेत. कोरोनाची स्थिती जोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत ही व्यवस्था सुरु राहील.

मे मध्ये कोणत्या दिवशी बँका बंद?

1 मे - 1 मे हा महाराष्ट्र दिन /कामगार दिन आहे. या दिवशी बेलापूर, बँगलोर, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, इम्फाल, कोची, कोलकाता, मुंबई, नागपूर, पणजी, पटणा आणि तिरुअनंतपुरम येथे बँका बंद असतील.

7 मे - Jumat-ul-Vida च्या निमित्ताने जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँक बंद असतील.

13 मे - रमजान या दिवशी ईद (Eid-UI-Fitra) आहे. त्यामुळे बेलापूर, जम्मू, कोची, मुंबई, नागपूर, श्रीनगर आणि तिरुअनंतपुरम येथे बँका बंद असतील.

14 मे - भगवान श्री परशुराम जयंती / रमजान-ईद (Eid-UI-Fitra) / बसवा जयंती आणि अक्षय तृतीया निमित्ताने अगरतला, अहमदाबाद, बँगलोर, भोपाळ, भुवनेश्वर, चंडीगड, चेन्नई, देहरादून, गंगटोक, गुवाहाटी, हैदराबाद, इम्फाल, जयपूर, कानपूर, कोलकाता, लखनऊ, नवी दिल्ली, पटना, पणजी, रायपूर, रांची, शिलाँग आणि शिमला येथे बँका बंद राहतील.