Ajay Devgan च्या मुलीचा हॉट अंदाज सगळ्यांनाच करतोय 'क्लीन बोल्ड'

न्यासाने इन्स्टाग्रामवर तिच्या चाहत्यांसह स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे

Updated: Jan 9, 2022, 03:23 PM IST
  Ajay Devgan च्या मुलीचा हॉट अंदाज सगळ्यांनाच करतोय 'क्लीन बोल्ड' title=

मुंबई : बॉलिवूड स्टार अजय देवगण आणि काजोलची लाडकी मुलगी न्यासा देवगण सध्या कमालीची चर्चेत आहे. न्यासा देवगन तिच्या फॅशनमुळे सगळ्यांचं लक्षवेधून घेते.

सध्या न्यासा तिचे शिक्षण स्वित्झर्लंडमध्ये करत असून ती आता सुट्टीचा आनंद घेत आहे. यादरम्यान तिचे काही फोटो समोर आले आहेत. दरम्यान, तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

न्यासाने इन्स्टाग्रामवर तिच्या चाहत्यांसह स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये तिच्यासोबत मित्रही आहेत. फोटोत, काजोलची मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत हिरव्या रंगाच्या क्रॉप टॉपमध्ये पोज देताना दिसत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्याचवेळी, तिच्या मैत्रिणीने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. न्यासाच्या फोटोवर चाहते कमेंट करत आहेत. नेटकऱ्यांनी न्यासाला तिच्या कपड्यांमुळे ट्रोल देखील करायला सुरुवात केली आहे. याआधी ही न्यासाचे अनेक बोल्ड फोटो समोर आलेत आहेत.