अमिताभ बच्चन

पुरस्कारासाठी `लागेबंध` हवेत - अमिताभ

बिग बी अमिताभ नाराज आहे. त्यांने जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यासाठी ट्विटरचा आसरा घेतला. पुरस्कारासाठी गुणवतेचा निकष डावलला जातोय, असे त्यांने ट्विट करताना म्हटलंय. आपण अधिक काही बोललो तर पुरस्कारांचे ‘पोलखोल’ होईल. अनेकांना ते परवडणार नाही आणि सहनही होणार नाही, असेही बिग सांगतात.

Nov 26, 2012, 12:38 PM IST

बच्चन यांची बाळासाहेबांना काव्यांजली

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूपश्चात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगवरून बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी अमिताभ बच्चन यांनी आपले वडील कवी स्व. हरिवंशराय बच्चन यांची एक कविता बाळासाहेबांना अर्पण केली आहे.

Nov 18, 2012, 08:24 AM IST

बच्चन यांना शिवसैनिकांकडून धक्काबुक्की, शारीरिक इजा

अमिताभ बच्चन यांनी यासंदर्भात ट्विट करताना सांगितलं, “होय, मला आणि अभिषेकला धक्काबुक्कीत थोडं खरचटलं. पण आम्ही ठीक आहोत. ‘मातोश्री’वरील डॉक्टरांनी आमच्यावर प्रथमोपचार केले.”

Nov 15, 2012, 10:38 AM IST

`मातोश्री`वर राज-अमिताभ समोरा समोर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजताच सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन मातोश्रीवर दाखल झाले. बाळासाहेबांना सध्या लाइफ सपोर्टिंग सिस्टमवर ठेवण्यात आल्याचं अमिताभ यांना डॉक्टरांकडून समजलं.

Nov 15, 2012, 09:36 AM IST

अमिताभवर देशद्रोहाचा आरोप... सडकून टीका!

‘फेसबूक’वर व्यक्त केलेल्या एका वक्तव्यामुळे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या देशभक्तीवर विविध स्तरांतून प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातंय.

Nov 14, 2012, 04:37 PM IST

बिग बीच्या घरी दिवाळीला २०० कंदील

अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या घरी यंदाची दिवाळी मोठी असणार आहे. यासाठी बच्चन यांनी ठाण्यातल्या कैलास देसले यांच्याकडं २०० आकाश कंदीलांची ऑर्डर नोंदवलीय. इको फ्रेंडली कंदील बनवण्यात त्यांचा हातखंडा आहे.

Nov 8, 2012, 04:57 PM IST

अमिताभ, माधुरीच कशाला हवेत?- अमोल पालेकर

बारामतीत होणाऱ्या नाट्यसंमेलनात अमिताभ बच्चन आणि माधुरी दीक्षित हे प्रमुख पाहुणे म्हणून कशाला हवेत, असा सवाल केलाय ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी.

Nov 5, 2012, 11:23 PM IST

‘मैं अण्णा हजारे हूँ’ म्हणणार अमिताभ!

निर्माता-दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या आगामी `सत्याग्रह` या चित्रपटात बीग बी अभिताभ बच्चन आता चक्क ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात बीग बींसोबत अजय देवगण प्रमुख भूमिकेत दिसेल.

Oct 25, 2012, 11:14 PM IST

मास्टर ब्लास्टरच्या 'महानायकाला' शुभेच्छा...

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी आज बॉलिवुडचे महानायक अमिताभ बच्चन यांना ७० व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभ यांच्या चांगल्या आरोग्याच्या आणि सुखी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Oct 11, 2012, 10:27 PM IST

महानायक सहस्त्रकाचा

अमिताभ. हे केवळ नावचं पुरेसं आहे सगळं काही सांगण्यासाठी. बॉलीवूडच्या या सुपरस्टारने आज वयाची सत्तरी गाठलीय. गेली चार दशकं अभिनयाच्या या शहेनशाहनं रुपेरी पडदा अक्षरश: व्यापून टाकला आहे. या महानायकाच्या जीवनातील असे काही पैलू.

Oct 11, 2012, 09:08 PM IST

अमिताभ... `वन मॅन इंडस्ट्री`

‘अमिताभ बच्चन’ या नावानं गेली चाळीस वर्ष भारतीय सिनेमावर अधिराज्य केलं. हा महानायक आज ७१ व्या वर्षात पदार्पण करतोय. शिस्तप्रिय कलाकार, उत्तम माणूस आणि शतकाच्या महानायकाच्या शहेनशाहच्या कारकिर्दीचा हा थोडक्यात आढावा...

Oct 11, 2012, 11:35 AM IST

`बिग बी` आजारी... सर्दी-खोकल्यानं हैराण

बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन आजारी पडलेत. त्यांना सर्दी-खोकल्यानं हैराण करून सोडलंय. ही माहिती दुसरं तिसरं कुणी दिली नसून स्वत: ‘बिग बी’नंच दिलीय. तेही सोशल वेबसाईट ट्विटरवरून...

Oct 1, 2012, 11:23 AM IST

‘बिग बी; फेसबूक, ट्विटरला वैतागले!

सध्या बिग बी अमिताभ बच्चन खूप वैतागलेत... कुणावर काय विचारताय? जिथं ते आपलं म्हणणं आपल्याला हव्या तशा पद्धतीनं मांडतात, आपल्या मनातल्या भरपूर काही गोष्टी आपल्या फॅन्सबरोबर शेअर करतात, अशा फेसबूक आणि ट्विटरवर आता मात्र बिग बी भडकलेत.

Sep 8, 2012, 01:51 PM IST

अमिताभ बच्चन `पाकिस्तानी`!

ऑस्कर पुरस्कार विजेते रसूल पोक्कुट्टी प्रथमच दिग्दर्शनात पाऊल ठेवत आहे. या सिनेमामध्ये अमिताभ बच्चन पाकिस्तानी नागरिकाची भूमिका साकारणार आहेत. रसूल पोक्कुट्टी यांचा आगामी सिनेमा हा रसूल यांचा ड्रिम प्रोजेक्ट आहे.
या सिनेमाचा विचार त्यंच्या मनात अनेक वर्षं घोळत होता. मात्र आता तो पडद्यावर येण्यास सुरूवात होणार आहे.

Aug 30, 2012, 09:10 AM IST

अमिताभ बच्चन आता फेसबुकवर

ब्लॉग आणि टि्वटरवरून लाखो चाहत्यांशी मनमोकळा संवाद साधणारे महानायक अमिताभ बच्चन यांनी ‘आय एम नाऊ ऑन फेसबुक...’ असे म्हणत सोशल नेटवर्किंग साईट ‘फेसबुक’वरही आपले आकाऊंट सुरू केले आणि अवघ्या अर्ध्या तासात तब्बल आठ लाख लोकांनी त्यांच्या पेजला लाईक केले.

Aug 22, 2012, 10:24 AM IST