सागर गायकवाड (प्रतिनिधी) नाशिक : तुमच्या मोबाईलवर पीएम किसान योजनेची लिंक आल्यास ती उघडण्याआधी थोडं थांबा. कारण तुमच्या बँक अकाऊंटवरील पैसे थेट हॅकर्सच्या खात्यात जावू शकतात. नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतक-यांना एका क्लिकने लाखोंचा फटका बसलाय. पीएम किसान योजनेची लिंक आहे म्हणून शेतक-यांनी लिंक उघडली आणि त्यांच्या बँक खात्यावरील पैसे गायब झालेत. हॅकर्सनी नाशिकमधील एका शेतक-याच्या खात्यातील अडीच लाखांवर डल्ला मारलाय. शेतक-यांनी याप्रकरणी नाशिक पोलिसांकडे तक्रारही दाखल केलीये.
शेतकरी पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याची आतुरतेनं वाट पाहतायत. त्यातच फोनवर पीएम किसान योजनेची लिंक आल्याने शेतक-यांनी उत्सुकतेपोटी लिंक उघडली आणि काही क्षणात कष्टाने साठवलेले पैसे हॅकर्सच्या घशात गेले. त्यामुळे अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय.
हेही वाचा : लाडकी बहीण नाही तर लाडक्या भावांनी उचलले योजनेचे पैसे; असा झाला उलगडा
सध्या सायबर गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय. आता हॅकर्सनी शेतक-यांकडे आपला मोर्चा वळवलाय. त्यामुळे झी 24 तासही तुम्हाला आवाहन करतंय की अशा कोणत्याही लिंकला बळी पडू नका. आधी खात्री करा आणि मगच पुढील पाऊल उचलला.