Team India : मागील वर्षी तब्बल 17 वर्षांनी टीम इंडियाला (Team India) पुन्हा एकदा आयसीसी टी 20 वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरण्यात यश आलं होतं. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेला फायनलमध्ये धूळ चारून चॅम्पियन ठरली होती. आता टीम इंडियाचं पुढील लक्ष चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 असणार आहे. 19 फेब्रुवारी पासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार आहे तेव्हा त्यापूर्वी बीसीसीआयने (BCCI) भारताच्या वर्ल्ड कप विजेत्या संघाला एक खास सरप्राईज गिफ्ट दिले.
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने 2024 वर्ल्ड कप टीम इंडियाच्या चॅम्पियन संघाचा भाग असलेल्या 15 खेळाडूंना एक खास हिऱ्याची अंगठी दिली गेली. या भेटीमागचं कारण देखील सांगण्यात आलं. गेल्या आठवड्यात मुंबईत बीसीसीआयचा नमन पुरस्कार 2025 हा सोहळा पार पडला. यात एनबीए आणि एनएफएल सारख्या अमेरिकन स्पोर्ट्स लीगप्रमाणेच टीम इंडियाच्या चॅम्पियन संघातील प्रत्येक संघाला बीसीसीआयने हिऱ्याची अंगठी बेहत देण्यात आली.
बीसीसीआयने खेळाडूंना भेट म्हणून दिलेली ही अंगठी फक्त हिरेजडीत नाही तर यात टी20 वर्ल्ड कप 2024 च्या आठवणी देखील आहेत. या अंगठ्या खास खेळाडूंसाठी डिझाईन करण्यात आल्या आहेत. अंगठीवर खेळाडूंची नाव आणि जर्सी क्रमांक लिहिलेले आहेत. ज्याच्यावर अशोक चक्र आहे. टी20 वर्ल्ड कप 2024 च्या फायनल सामन्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा सारख्या दिग्गजांनी या टी 20 फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. त्यांच्यासाठी ही भेट खूप खास ठरेल. खेळाडूंना भेट दिलेल्या या हिऱ्यांच्या अंगठीची किंमत जाहीर करण्यात आलेली नसली तरी मीडिया रिपोर्ट्सनुसार अंगठीची किंमत लाखोंमध्ये असल्याचे बोलले जात आहे.
Presenting TeamIndia with their CHAMPIONS RING to honour their flawless campaign in the T20WorldCup
Diamonds may be forever, but this win certainly is immortalised in a billion hearts. These memories will 'Ring' loud and live with us forever NamanAwards pic.twitter.com/SKK9gkq4JR
— BCCI (BCCI) February 7, 2025
बीसीसीआयने ही खास भेट देताना म्हटले की, 'टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये टीम इंडियाच्या उत्कृष्ट कामगिरीच्या सन्मानार्थ चॅम्पियन्स खेळाडूंना ही खास अंगठी भेट म्हणून दिली जातं आहे. यातील हिरे कायमचे असतील परंतु हा विजय नक्कीच अनेक अब्ज लोकांच्या अंत: करणात अमर झाला आहे. या आठवणी नेहमीच आपल्याबरोबर असतील.