'सत्यानाश कर दिया...', 'गोरी हैं कलाइयाँ' गाण्याचा रिमेक ऐकून चाहत्यांचा संताप

'मेरे हसबैंड की बीवी' या चित्रपटातील 'गोरी हैं कलाइयाँ' हे गाणं प्रेक्षकांना अजिबात आवडलेले नाही. या गाण्याबद्दल चाहत्यांनी संताप व्यक्त केलाय. 

सोनेश्वर पाटील | Updated: Feb 7, 2025, 06:46 PM IST
'सत्यानाश कर दिया...', 'गोरी हैं कलाइयाँ' गाण्याचा रिमेक ऐकून चाहत्यांचा संताप title=

Gori Hai Kalaiyan Remake: बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर, अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि रकुलप्रीत सिंह यांचा आगामी चित्रपट 'मेरे हसबैंड की बीवी' 21 फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. अशातच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून या चित्रपटातील 'गोरी हैं कलाइयाँ' हे गाणं देखील रिलीज झालं आहे. हे गाणं 'आज का अर्जुन' चित्रपटातील 'गोरी हैं कलाइयाँ' चे रिमेक आहे. अर्जुन कपूरचे हे गाणं रिलीज होताच चर्चेत आलं आहे. चाहत्यांना हे गाणं अजिबात आवडले नाही. 

'गोरी हैं कलाइयाँ' या गाण्याच्या रिमेकसाठी रॅपर बादशाह आणि कनिका कपूर यांनी आपला आवाज दिला आहे. मात्र, हे गाणं चाहत्यांनी ऐकल्यानंतर प्रेक्षकांनी निर्माते आणि गायकांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. 'मेरे हसबैंड की बीवी' या चित्रपटाच्या निर्मात्यांनी हे गाणं यूट्यूबवर शेअर करताच लोकांनी या गाण्यावर वेगवेगळ्या कमेंट्स करण्यास सुरुवात केली. ज्यामध्ये काही चाहत्यांनी कमेंट्स करून 'सत्यानाश कर दिया' असं म्हटलं आहे. तर काहींनी मूळ गाण्याला लताजींचा आवाज होता त्यामुळे ते चांगले होते असं देखील म्हटलं आहे. 

आणखी एक क्लासिक गाणं उद्धवस्त झालं

'मेरे हसबैंड की बीवी' या चित्रपटातील सर्व कलाकारांनी 'गोरी हैं कलाइयाँ' हे गाणं त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले तेव्हा देखील चाहत्यांनी त्यांना ट्रोल केलं. कमेंट्स करून चाहत्यांनी संताप व्यक्त केला. एका चाहत्याने म्हटले की, आणखी एक क्लासिक गाणं उद्धवस्त झालं. तर दुसऱ्या चाहत्याने काहीतरी वेगळं आणा, तुम्ही फक्त रिमेक देणार का? असा सवाल उपस्थित केला. तर तिसऱ्याने आम्हाला या रिमेकची गरज नव्हती. हे एक बकवास गाणं आहे. अमिताभ बच्चन आणि जया प्रदा यांचं मूळ गाणं हे खूप सुंदर असल्याचं काही चाहत्यांनी म्हटलं. 

'मेरे हसबैंड की बीवी' हा चित्रपट वासू भगनानी यांच्या प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत मुदस्सर अझीझ दिग्दर्शित आहे. या चित्रपटात अर्जुन कपूर, भूमी पेडणेकर आणि रकुलप्रीत सिंग यांच्याव्यतिरिक्त शक्ती कपूर, दिनो मोरिया, अनिता राज आणि आदिष्ठ सील हे कलाकारही दिसणार आहेत.