Sanju Samson : टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि विकेटकिपर संजू सॅमसन (Sanju Samson) याला बऱ्याचदा चांगलं परफॉर्म करून देखील महत्वाच्या स्पर्धेत खेळण्यासाठी टीम इंडियात (Team India) संधी दिली जात नाही. यावरून संजू सॅमसनची पाठराखण करण्यासाठी अनेकजण त्याची बाजू घेत असतात. परंतु अशातच माजी क्रिकेटर श्रीसंत याने सॅमसनची बाजू घेत असताना केरळ क्रिकेट असोसिएशनशी पंगा घेतला आहे. केरळ क्रिकेट असोसिएशनने श्रीसंतवरती क्रिकेट संचालन संस्थेविरुद्ध चुकीचे आणि अपमानजनक वक्तव्य केल्याचा आरोप लावला आहे.
केसीएने श्रीसंत विरोधात कारणे सांगा नोटीस काढली आहे. केसीएने शुक्रवारी जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्रीसंतला दिलेल्या कारणे दाखवा नोटिशीचा सॅमसन प्रकरणाशी काहीही संबंध नाही. संघटनेविरूद्ध दिशाभूल करणारी आणि अपमानास्पद टीका करण्यासाठी त्याला ही नोटीस पाठविली गेली आहे. श्रीसंतने टीव्ही चर्चेदरम्यान सॅमसनला आपलं समर्थन देण्याचं वचन दिलं. संजू सॅमसनची राज्याच्या संघात निवड न केल्यामुळे केसीएला जाब विचारला होता. तसेच केरळच्या अन्य खेळाडूंच्या सुरक्षेचे देखील सुद्धा वचन दिले होते.
हेही वाचा : वर्ल्ड कप विजेत्या 15 खेळाडूंना BCCI कडून हिऱ्याची अंगठी, काय आहे यात खास? किंमत ऐकून थक्क व्हाल
टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर संजू सॅमसनला केरळ क्रिकेट असोसिएशनने त्यांच्या संघात संधी दिली नाही. त्यावेळी माजी क्रिकेटर श्रीसंतने केरळ क्रिकेट असोसिएशनबद्दल वक्तव्य केलं होतं. तसेच सॅमसनच्या वडिलांनी देखील राज्य क्रिकेट बोर्डावर निशाणा साधला होता. सॅमसनचे वडील म्हणाले होते की त्यांच्या मुलाची केरळ क्रिकेट असोसिएशन सोबत वैयक्तिक दुश्मनी नाही तरीही त्याच्यासोबत असं केलं जात आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघात सॅमसनची निवड झाली नाही त्यामुळे केरळ क्रिकेट असोसिएशनच्या संघात पुढील देशांतर्गत सामन्यांसाठी सॅमसनची निवड होईल असे वाटत होते, परंतु तसे होऊ शकले नाहीत.