MI Full Schedule: IPL 2025 मध्ये मुंबई इंडियन्स 7 मॅच होम ग्राउंडवर खेळणार, पाहा संपूर्ण वेळापत्रक

IPL 2025 Full Schedule : आयपीएलच्या 18 व्या सीजनला 22 मार्च पासून सुरुवात होणार आहे तर या स्पर्धेचा फायनल सामना हा 25 मे रोजी खेळवला जाईल.

पुजा पवार | Updated: Feb 17, 2025, 04:42 PM IST
MI Full Schedule: IPL 2025 मध्ये मुंबई इंडियन्स 7 मॅच होम ग्राउंडवर खेळणार, पाहा संपूर्ण वेळापत्रक   title=
(Photo Credit : Social Media)

Mumbai Indians IPL 2025 Full Schedule : आयपीएल 2025 च्या वेळापत्रकाची घोषणा रविवारी 16 फेब्रुवारी रोजी झालेली आहे. आयपीएल 2025 ही स्पर्धा जवळपास 2 महिने रंगणार असून यात 10 संघ मिळवून एकूण 74 सामने खेळणार आहेत. आयपीएलच्या 18 व्या सीजनला 22 मार्च पासून सुरुवात होणार आहे तर या स्पर्धेचा फायनल सामना हा 25 मे रोजी खेळवला जाईल. मुंबई इंडियन्स ही आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी टीम आहे. तेव्हा मुंबई इंडियन्स यंदा किती सामने खेळणार जाणून घेऊयात. 

सहावी ट्रॉफी जिंकण्यासाठी उतरणार मुंबई इंडियन्स : 

मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 5 वेळा विजेत्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. आता संघ सहाव्यांदा ट्रॉफी जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. मुंबई इंडियन्स यंदाच्या स्पर्धेत एकूण 14 सामने खेळणार असून यातील 7 सामने होम ग्राउंडवर खेळेल. तर उर्वरित 7 सामने हे भारतातील इतर शहरांमध्ये खेळेल. 23  मार्च रोजी मुंबई इंडियन्स आयपीएल 2025 चा पहिला सामना चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध खेळेल. हा सामना चेपॉक स्टेडियमवर पार पडेल. यंदाही मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद हार्दिक पंड्याकडेच असणार आहे. 

मुंबई इंडियन्सच्या सामन्यांचं वेळापत्रक : 

23  मार्च : मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स 
29  मार्च : मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स 
31  मार्च : मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स 
4 एप्रिल : मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स 
7 एप्रिल : मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 
13 एप्रिल : मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स 
17 एप्रिल : मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद 
20 एप्रिल : मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स 
23 एप्रिल : मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद 
27 एप्रिल : मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स 
1 मे : मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स 
6 मे : मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स 
11 मे : मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स 
15 मे : मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स 

13 विविध शहरांमध्ये रंगणार आयपीएलचा महासंग्राम : 

भारतातील 13 विविध शहरांमध्ये आयपीएलचे 74 सामने रंगणार आहेत.  22 मार्च रोजी ओपनिंग सामना हा ऐतिहासिक ईडन गार्डन स्टेडियमवर होणार असून हा सामना गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होईल.20 मे रोजी क्वालीफायर-1 आणि 21 मे रोजी एलिमिनेटर-2 हे सामने हैदराबादमध्ये होतील. 23 मे रोजी क्वालीफायर 2 आणि 25 मे रोजी फायनल सामना हा कोलकातामध्ये होईल.