Ranveer Allahbadia : प्रसिद्ध पॉडकास्टर आणि युट्यूबर रणवीर अलाहबादिया गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोमध्ये एका स्पर्धेकाला विचारलेल्या प्रश्नामुळे रणवीर वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्याने 'इंडियाज गॉट लेटेंट' स्पर्धकाला विचारलं की, 'तुला तुझ्या पालकांना आयुष्यभर सेक्स करताना पाहायला आवडेल की त्यामध्ये सहभागी होऊन हा प्रकार कायमचा संपवायला आवडेल?' या प्रश्नानंतर हा कार्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर त्याचा या वादग्रस्त विधानाची राज्य सरकारने दखल घेतली. रणवीर इलाहाबादिया आणि समय रैना यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. (Ranveer Allahabadia father runs a sperm bank he the one who impregnated a gay couple miracle man)
दरम्यान या घटनेनंतर सोशल मीडियावर रणवीर अलाहबादियाबद्दल अनेक गोष्टी गुगलवर सर्च करण्यात येत आहे. रणवीरने पालकासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांना त्यांच्या वडिलांबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता आहे. तर आम्ही तुम्हाला सांगतो, रणवीरच्या वडिलांचं नाव गौतम अलाहबादिया असून ते डॉक्टर आहेत. रणवीर प्रमाणेच त्याचे वडीलही त्यांच्या कारकिर्दीत खूप प्रसिद्ध आहेत. गौतम अलाहबादिया यांना जगभरात मॅजिकल मॅन म्हणून ओळखल जातात. कारण डॉ. गौतम अलाहबादिया हे एक प्रसिद्ध आयव्हीएफ तज्ज्ञ असून ते स्पर्म बँक चालवतात. विशेष म्हणजे त्यांनी भारतातील पहिली ट्रान्स-एथनिक सरोगसी आणि पहिली लेस्बियन जोडपी गर्भधारणा यशस्वीरित्या पार पाडली आहे.
डॉ. गौतम अलाहबादिया हे डॉक्टरांच्या कुटुंबातील आहेत. जरी लहानपणी त्यांना कलाकार व्हायचं होतं. त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला, त्यांनी त्यांच्या इमारतीच्या गॅरेजमध्ये एक लहान क्लिनिक आणि लॅब सुरू केली. नंतर, त्यांनी 'रोटुंडा' नावाचे आयव्हीएफ सेंटर स्थापन केलं. रोटुंडा हे भारतातील LGBT (लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर) फ्रेंडली क्लिनिक म्हणून ओळखलं जातं.
यानंतर गौतम यांनी 1996 मध्ये स्पर्म बँक उघडली होती. त्यावेळी त्याचे पालकांनी यासाठी विरोध केला होता. लोक स्पर्म बँकांच्या विरोधात होते आणि त्यांच्यावर टीका झाली होती पण त्यांनी बँकेकडून कर्ज घेतले आणि स्पर्म बँक उघडली. त्यांना माहित होते की काळ बदलत आहे आणि स्पर्म बँकांची गरज वाढणार आहे.
रणवीर अलाहबादिया यांचं वडील गौतम इलाहाबादिया यांनी भारतातील पहिली ट्रान्स-एथनिक सरोगसी आणि समलिंगी जोडप्यासाठी पहिली गर्भधारणा केली. भारतातील पहिले LGBT फ्रेंडली क्लिनिक सुरू केले. पुनरुत्पादक औषधांच्या क्षेत्रातील त्यांच्या अग्रणी भूमिकेमुळे, असाधारण कार्यांमुळे आणि कामगिरीमुळे त्यांना चमत्कारी पुरुष म्हटलं जातं. तर रणवीर अलाहबादिया यांच्या आई डॉ. स्वाती अलाहबादिया या व्यवसायाने स्त्रीरोगतज्ज्ञ आहे.