Maharashtra IAS Transfer : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबजनक घडामोडी नेहमीच घडत असतात. आता मात्र, राजकाराणासह प्रशासनातही खळबळ घडामोडी घडताना दिसत आहेत. 2025 या वर्षाच्या दुसऱ्या दिवसापासून बड्या IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. आज(18 फेब्रुवारी) 9 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. विशेष म्हणजे फेब्रुवारी महिन्यात तीनदा अधिकाऱ्यांच्या बदलीची ऑर्डर काढण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या 18 दिवसांत 26 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
4 फेब्रुवारी 2025 रोजी एकाचवेळी 13 IAS अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. 11 फेब्रुवारी 2025 रोजी चार अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश काढण्यात आले. डॉ कुणाल खेमनार, आयुक्त साखर, पुणे यांची बदली जॉइंट सीईओ एमआयडीसी, मुंबई येथे करण्यात आली आहे. डॉ मंतदा राजा दयानिधी, जिल्हाधिकारी, सांगली यांची जॉइंट एमडी सिडको नवी मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. अशोक काकडे एमडी सारथी यांची जिल्हाधिकारी सांगली येथे बदली करण्यात आली आहे. अनमोल सागर सीईओ झेडपी लातूर यांची बदली मनपा आयुक्त भिवंडी निजामपूर बहुविध महामंडळात करण्यात आली आहे. तर आज म्हणजेच 18 फेब्रुवारी 2025 रोजी 9 अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. यापूर्वी 2 जानेवारी 2025 रोजी 10 अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली.