Radhika Apte Viral Pics: आपल्या अभिनयाने सर्वांना गारद अभिनेत्री राधिका आपटे सोशल मिडियावर ट्रोल झाली आहे. याला कारण ठरल आहे तो एक फोटो. राधिका आपटेने बाफ्टा अवॉर्ड्सला हजेरी लावली. या कार्यक्रमावेळी तिने बाथरुममध्ये काढलेला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत राधिकाच्या एका हातात ब्रेस्ट पंप तर दुसऱ्या हातात वाईनचा ग्लास दिसत आहे. तिच्या फोटोवर हजारो चाहत्यांनी चित्र विचित्र कमेंट केल्या आहेत.
2012 साली राधिका आणि बेनेडिक्ट टेलर लग्न बंधनात अडकले. बेनेडिक्ट हा ब्रिटीश व्हॉयलिन प्लेअर आणि संगीतकार आहे. आता लग्नानंतर 12 वर्षांनी दोघं आईबाबा झाले आहेत. वयाच्या 39 व्या वर्षी राधिका आई बनली आहे. डिसेंबर महिन्यात राधिकाने गोंडस बाळाला जन्म दिला. डिलीव्हरीनंतर राधिका पुन्हा एकदा कामाला लागली आहे.
18 फेब्रुवारी रोजी राधिकाने एक फोटो शेअर केला आहे. झी बाफ्टाची रिअॅलिटी पहा. मी नताशाचे आभार मानू इच्छिते, जिच्यामुळे मी इथे येऊ शकले.' तिने माझ्या ब्रेस्ट पंपिंगच्या वेळेनुसार कार्यक्रमाचं वेळापत्रक आखलं. ती फक्त माझं दूध काढण्यासाठी माझ्यासोबत वॉशरूममध्ये आली नाही तर, तिने तिथे माझ्यासाठी शॅम्पेनही आणली होती. अशी कॅप्शन तिने या फोटोला दिली आहे.
मात्र, या फोटोमुळे राधिका चांगलीच ट्रोल झाली आहे. 'राधिका मॅडम, तुम्ही खूप छान आहात. पण असं करू नका... अशी कमेंट एकाने केली आहे. 2025 मध्येही तुम्हाला बाथरूममध्ये पंप करावं लागत आहे हे दुःखद आहे असल्याची कमेंट एका चाहत्याने केली. 'खरं तर स्तनपान करताना दारू पिऊ नये. अशा प्ररकारच्या पोस्टद्वारे तू चुकीचा संदेश देत आहेस. स्तनपान करताना पिणे योग्य नाही असा सल्ला एका युजरने दिला आहे. काहींनी राधिकाचे कौतुकही केले आहे. यापूर्वी देखील राधिकाने स्तनपान करतानाचा फोटो सोशल मिडियावर शेअर केला होता.
राधिकाने ‘फोबिया’, ‘हंटर’, ‘पॅड मॅन’, ‘बदलापूर’, ‘फॉरेन्सिक’, ‘बाजार’, ‘विक्रम वेधा’, ‘कबाली’, ‘अंधाधुंद’, ‘द वेडिंग गेस्ट’, ‘लस्ट स्टोरीज’, ‘मेरी ख्रिसमस’, ‘लय भारी’, ‘तुकाराम’, ‘शोर इन द सिटी’, ‘वेत्री सेलवन’, ‘मांझी द माऊंटन मॅन’ यांसारख्या अनेक मराठी, हिंदी आणि इंग्रजी चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे.