History : वडिलांची हत्या करुन स्वत:च्या आईशी लग्न केले; जगाच्या इतिहासातील सर्वात रहस्यमयी राजा

नशिबात जे लिहीलेले असतं तसचं घडत. किती प्रयत्न केला तरी काही गोष्टी टाळता येत नाही. अशीच एक विचित्र कहाणी इतिहासात घडली आहे. एका राजाने वडिलांची हत्या करुन स्वत:च्या आईशी लग्न केले. जाणून घेऊया कोण आहे हा राजा. 

वनिता कांबळे | Updated: Feb 18, 2025, 06:39 PM IST
History : वडिलांची हत्या करुन स्वत:च्या आईशी लग्न केले; जगाच्या इतिहासातील सर्वात रहस्यमयी राजा

Oedipus Rex : आई आणि मुलाचे नातं हे जगातील सर्वात पवित्र नाते मानले जाते. जगाच्या इतिहासात एक असा रहस्यमयी राजा होता ज्याने आपल्या वडिलांची हत्या करुन स्वत:च्या आईशी लग्न केले. मुलाशी लग्न करणारी आई मात्र, आत्महत्या करते. या रहस्यमयी राजाची विचित्र कहाणी नेमकी काय आहे आहे समजल्यावर तुमचं डोकं चक्रावून जाईल. जाणून घेऊया वडिलाची हत्या करुन आईशी विवाह करणारा राजा कोण? तो कोणत्या देशाचा राजा होता. त्याची संपूर्ण कहाणी जाणून घेऊया. 

या रहस्यमयी राजाचं नाव आहे ओडिपस. या राजाबद्दल जाणून घ्यायचे असेल तर ग्रीम पौराणिक कथांचा अभ्यास करावा लागेल. ‘ओडिपस द किंग" (Oedipus Rex) हे नाटक ओडिपस राजाच्या आयुष्यात घडलेली रहस्यमयी घटना आणि विचित्र योगायोगावर आधारीत आहे. ओडिपस राजा जन्माला येण्याआधीच तो जन्मदात्या आईशी विवाह करेल असे भाकित वर्तवण्यात आले होते. हे भाकित खरे ठरले आणि या राजाचे खरोखरचं वडिलांची हत्या करुन आईशी विवाह केला. 

ओडिपस हा ग्रीकचा थेब्सच्या राजा लायस आणि राणी जोकोस्ता यांचा मुलगा. ओडिपस याच्या जन्मावेळी  राजा लायस आणि राणी जोकोस्ता यांना एक भाकीत मिळालं होतं. त्यांचा मुलगा मोठा झाल्यावर आपल्या वडिलांचा वध करेल आणि आपल्या आईशी विवाह करेल असे हे भाकित होते. या भाकीतामुळे  राजा लायस आणि राणी जोकोस्ता यांनी घाबरून आपल्या नवजात मुलाला डोंगरावर सोडून देण्याचा निर्णय घेतला. 

ओडिपस याला डोंगरावरुन सोडून दिले तरी तो बचावतो. एक मेंढपाळ त्या बाळाला वाचवतो. मेंढपाळ हे बाळ घेऊन कोरिंथच्या राजाकडे जातो. कोरिंथचा राजा हे बाळ घेतो त्याला ओडिपस असे नाव देऊन स्वतःचा दत्तक पुत्र म्हणून त्याचे पालन पोषण करतो.

मोठा झाल्यावर ओडिपसला समजते की त्याच्या नशिबात त्याच्या वडिलांचा वध करणे आणि आपल्या आईशी विवाह करणे आहे असं समजते. त्याचवेळी त्याला असेही समजते की कोरिंथचा राजा आणि राणी त्याचे खरे आई वडिल नाहीत. यामुळे तो त्याला दत्तक घेतलेल्या आई वडिल तसेच कोरिंथ सोडून बाहेर जाण्याचा निर्णय घेतो. मात्र, कोरिंथ सोडून बाहेर पडल्यावर त्याच्या नशिबात जे लिहीले आहे तेच घडते. 

कोंरिथ मधून बाहेर पडल्यावर प्रवासादरम्यान त्याचा  एका अनोळखी वृद्ध व्यक्तीशी वाद होतो. संतापाच्या भरात ओडिपस त्याचा वध करतो. यानंतर तो थेब्स नगरीत पोहोचतो. स्फिंक्स राज्यात राक्षसाचा उपद्रव सुरू असतो. ओडिपस स्फिंक्सच्या कोड्याचे उत्तर देऊन त्या शहराला संकटातून सोडवतो.  थेब्सचे नागरिक त्याला आपला राजा बनवतात. यानंतर ओडिपस स्फिंक्स राज्याची काणी जोकोस्ताशी विवाह करतो, जी प्रत्यक्षात त्याची जन्मदात्री आई असते. हे सत्य देखील अत्यंत विचित्रपणे पद्धतीने उघडकीस येते. 

ओडिपस आणि जोकोस्ता यांच्या विवाहनंतर काही वर्षांनी थेब्समध्ये महामारी पसरते.  तेव्हा ओडिपस सत्य शोधण्यासाठी एक तांत्रिकाला (Oracle) विचारतो तेव्हा सत्य बाहेर येते. ज्याची आपण रागाच्या भरात हत्या केली तो आपला पिता होता आणि जिच्याशी आपण विवाह केला ती आपली माता आहे सत्य ओडिपसला समजते. सत्य समजल्यावर ओडिपस खूपच अस्वस्थ होतो. चो स्वतःच्या डोळ्यांवर सूऱ्याने घाव घालून अंध होतो. तर, ज्याच्याशी आपला विवाह झाला आहे तो आपला मुलगा आहे समजल्यावर जोकोस्ता स्वतःला फाशी लावून घेते. 

हे देखील वाचा... दिल्लीच्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्राच्या संभाजीनगरमध्ये कुणी? का आणि कधी बांधली?