मोठी बातमी! हार्दिक नाही रोहित शर्मा करणार मुंबई इंडियन्सचं नेतृत्व? IPL 2025 पूर्वीच MI अडचणीत

IPL 2025 : आयपीएलमधील यशस्वी संघांपैकी एक असणारा मुंबई इंडियन्स संघ 23 मार्च रोजी त्यांचा पहिला सामना खेळणार आहे. 

पुजा पवार | Updated: Feb 17, 2025, 01:19 PM IST
मोठी बातमी! हार्दिक नाही रोहित शर्मा करणार मुंबई इंडियन्सचं नेतृत्व? IPL 2025 पूर्वीच MI अडचणीत
(Photo Credit : Social Media)

IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीग या जगप्रसिद्ध टी 20 लीगच्या 18 व्या सीजनचं वेळापत्रक जाहीर झालं असून 22 मार्च पासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. यंदा स्पर्धेत 10 संघांचा सहभाग असणार असून भारतातील एकूण 13 शहरांमध्ये 74 सामने खेळवले जाणार आहेत. आयपीएलमधील यशस्वी संघांपैकी एक असणारा मुंबई इंडियन्स संघ 23 मार्च रोजी त्यांचा पहिला सामना खेळणार आहे. मात्र असं असताना नव्या सीजनपूर्वीच मुंबई संघाला मोठा धक्का बसला असून त्यांचा कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याला पहिल्या सामन्याला मुकावे लागणार आहे. 

IPL 2024 मध्ये हार्दिक पंड्या बनला कर्णधार :

मुंबई इंडियन्सने आयपीएल 2024 पूर्वी गुजरात टायटन्सचा कर्णधार असलेल्या हार्दिक पांड्याला ट्रेड करून आपल्या संघात घेतले. एवढंच नाही तर रोहित शर्माला बाजूला करून त्याला मुंबई इंडियन्सचे कर्णधार बनवले. यावरून मुंबई इंडियन्स आणि रोहितचे फॅन्स नाराज झाले होते. हार्दिकच्या नेतृत्वात आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्स चांगला परफॉर्मन्स दाखवू शकली नाही. स्पर्धेअंती मुंबईचा संघ पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर आला. आयपीएल 2025 मध्ये सुद्धा हार्दिक पंड्या हाच मुंबई इंडियन्सचा कर्णधार असणार आहे. आगामी सीजनमध्ये त्याच्या नेतृत्वात संघ कसा परफॉर्म करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्सच्या पहिल्या सामन्याला कर्णधार हार्दिक पंड्या मुकणार आहे. 

एका सामन्याची बंदी :  

आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सने लखनऊ विरुद्ध खेळलेल्या शेवटच्या सामन्यात केलेल्या चुकांमुळे पंड्यावर आणि संपूर्ण संघावर कारवाई करण्यात आली होती. वानखेडे स्टेडियमवर लखनऊ विरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स त्यांचे ओव्हर्स वेळेतपूर्ण करू शकली नव्हती. त्यामुळे बीसीसीआयच्या नियमांनुसार हार्दिक पंड्यावर एका सामन्याचा बॅन लावण्यात आला होता. पंड्या आयपीएल 2025 मध्ये कोणत्या दुसऱ्या संघासाठी खेळला असता तरी त्याला एका सामन्याची बंदी झेलावीच लागली असती. आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्सचा पहिला सामना हा 23 मार्च रोजी चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध असणार आहे. चेन्नईच्या होम ग्राउंडवर हा सामना खेळवला जाणार असून हार्दिक पंड्यावर एका सामन्याची बंदी असल्याने यात रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करताना दिसू शकतो. 

हेही वाचा : मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात नव्या खेळाडूची एंट्री, 330 विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला स्थान

 

मुंबई इंडियन्सच्या सामन्यांचं वेळापत्रक : 

23  मार्च : मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स 
29  मार्च : मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स 
31  मार्च : मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स 
4 एप्रिल : मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स 
7 एप्रिल : मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 
13 एप्रिल : मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स 
17 एप्रिल : मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद 
20 एप्रिल : मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स 
23 एप्रिल : मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद 
27 एप्रिल : मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स 
1 मे : मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स 
6 मे : मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स 
11 मे : मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स 
15 मे : मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स