Knife attack in Local Train: कल्याण ते डोंबिवली दरम्यान धावत्या लोकल ट्रेन मध्ये चाकू हल्ला झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या हल्लेखोराने तिघाजणांवर चाकू हल्ला केला आहे. यामुळे लोकलमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कसा घडलाय हा प्रकार? सविस्तर जाणून घेऊया.
मुंबईत राहणारा 19 वर्षीय शेख जिया हुसेन नावाचा तरुण लोकलने प्रवास करत होता. लोकल कल्याण ते डोंबिवली दरम्यान होती. काही कारणामुळे त्याचा सहप्रवाशांसोबत वाद झाला. यावेळी शेख जिया हुसेनने खिशातला चाकू काढला आणि तीन प्रवाशांवर हल्ला केला.
अक्षय वाघ, हेमंत काकरिया आणि राजेश चांगलानी असे जखमी प्रवाशांची नावे आहेत. कल्याणवरून दादरला जाणाऱ्या 9:47 जलद लोकलमध्ये ही घटना घडली. धक्का लागण्यावरून प्रवाशांशी वाद झाला आणि त्याने चाकू हल्ला केल्याची माहिती प्रवाशांनी दिली आहे.
डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी काही तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.