MS Dhoni च्या IPL निवृत्तीबाबत आली मोठी अपडेट, माहीने स्वतः केलं स्पष्ट

IPL 2025 : यंदाच्या सीजनपूर्वी सुद्धा आयपीएल 2025 धोनीचा शेवटचा सीजन असणारा का याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. याचर्चांवर धोनीने स्वतः उत्तर दिलंय. 

पुजा पवार | Updated: Feb 20, 2025, 04:47 PM IST
MS Dhoni च्या IPL निवृत्तीबाबत आली मोठी अपडेट, माहीने स्वतः केलं स्पष्ट
(Photo Credit : Social Media)

IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 18 व्या सीजनला 22 मार्च पासून सुरुवात होणार आहे. जवळपास 4 वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला एम एस धोनी (MS Dhoni) अजूनही चेन्नई सुपरकिंग्ससाठी खेळतो. त्याला आयपीएलचे (IPL 2025) सामने खेळताना पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक असतात. दरवर्षी धोनी आयपीएलमधून निवृत्त होणार अशी चर्चा सुरु असते, मात्र धोनी दरवर्षी नव्या जोमाने क्रिकेटच्या मैदानावर चाहत्यांना त्याच्या खेळाने इम्प्रेस करण्यासाठी सज्ज असतो. यंदाच्या सीजनपूर्वी सुद्धा आयपीएल 2025 धोनीचा शेवटचा सीजन असणारा का याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. याचर्चांवर धोनीने स्वतः उत्तर दिलंय. 

एम एस धोनी एक अँप लाँच इव्हेंटसाठी आला होता. यावेळी त्याने म्हटले, 'मी 2019 मध्ये आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आता फक्त काही वर्ष शिल्लक आहेत, त्यात एक लहान मुलाप्रमाणे मी खेळाची मजा घेऊ इच्छितो'. त्याने पुढे म्हटले, 'मी याच प्रकारे खेळाची मजा घेऊ इच्छितो जसे मी शाळेत असताना घ्यायचो. मी जेव्हा एका कॉलोनीमध्ये राहायचो तेव्हा दुपारी चार वाजता खेळायला जायचो. आम्ही त्यावेळी क्रिकेटचं खेळायचो आणि हवामान खराब झाल्यावर फ़ुटबाँल खेळाची मजा घ्यायचो. मला त्याच निर्दोषतेसह खेळायचे आहे परंतु ते इतके सोपे नाही'. धोनीने आयपीएल 2025 नंतर निवृत्ती घेणार की  नाही यावर थेट भाष्य करणं टाळलं आहे. 

हेही वाचा : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच मॅचमध्ये पाकिस्तानी खेळाडू एकमेकांशीच भिडले, मैदानात घातला वाद Video

 

धोनीने म्हटले की भारतासाठी खेळताना त्याचं ध्येय हे आपलं सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करण्यावर होता. धोनीने म्हंटले की, 'एक क्रिकेटर म्हणून भारतीय क्रिकेट संघासाठी मी नेहमीच चांगलं प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. मी हे आधी सुद्धा बोललोय की प्रत्येकाला देशासाठी खेळण्याची संधी मिळत नाही'. धोनीने युवा खेळाडूंना स्वत:साठी योग्य खेळाडू शोधून प्राधान्यक्रम ठरवण्याचा सल्ला दिला. 

ऋतुराज गायकवाडकडे सोपवलं नेतृत्व : 

एम एस धोनीने आयपीएल 2024 पूर्वी चेन्नई सुपरकिंग्सचं नेतृत्व ऋतुराज गायकवाडकडे सोपवलं होतं. यापूर्वी धोनीच्या नेतृत्वात सीएसकेने आयपीएलच्या 5 ट्रॉफी जिंकल्या. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात चेन्नई सुपरकिंग्सने चांगली कामगिरी केली परंतु ते प्लेऑफसाठी क्वालिफाय करू शकले नाहीत. आयपीएल 2025 मध्ये सीएसकेचे लक्ष्य सहावी ट्रॉफी जिंकण्याकडे असेल.