Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला आता अवघे काही दिवस शिल्लक असून या स्पर्धेसाठी टीम इंडिया दुबईला पोहोचली आहे. 19 फेब्रुवारी पासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे, तर भारताचा पहिला सामना 20 मार्च रोजी बांगलादेश विरुद्ध खेळवला जाईल. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा हायब्रीड पद्धतीने खेळवली जाणार असून याचे सामने पाकिस्तान आणि दुबईत होतील. टीम इंडिया (Team India) त्यांचे सर्व सामने दुबईत खेळेल. मात्र दुबईत सराव करत असताना भारताच्या एका स्टार खेळाडूला दुखापत झाली आहे. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अवघे काही दिवस उरलेले असताना टीम इंडियाचं टेन्शन वाढलंय.
15 फेब्रुवार शनिवारी टीम इंडिया दुबईत पोहोचली. सोमवारी सराव करत असताना भारताचा स्टार फलंदाज आणि विकेटकिपर ऋषभ पंत याला दुखापत झाली. ऋषभला ही दुखापत हार्दिक पंड्याचा शॉट लागल्यामुळे झाली. सरावादरम्यान हार्दिकने मारलेला बॉल ऋषभच्या डाव्या पायावर जाऊन लागला. बॉल लागताच पंत खाली पडला. तो वेदनेने विव्हळत होता, तेव्हा हार्दिक आणि सपोर्ट स्टाफमधील व्यक्ती त्याच्याजवळ गेले. यानंतर ऋषभ पंतला मैदानाबाहेर नेण्यात आले. ऋषभला झालेली दुखापत किती गंभीर आहे याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. परंतु थोड्या वेळाने पंत पट्टी बांधून पुन्हा सरावासाठी उतरला. त्यामुळे ही दुखापत जास्त गंभीर नसावी असं कळतंय.
हेही वाचा : मोठी बातमी! हार्दिक नाही रोहित शर्मा करणार मुंबई इंडियन्सचं नेतृत्व? IPL 2025 पूर्वीच MI अडचणीत
hoping this is not serious pic.twitter.com/XpN5smtViK
— a(incessantkohli) February 16, 2025
टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आलेला आहे की चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीम सिलेक्शन मीटिंगमध्ये आगरकर आणि गंभीर यांच्यात जोरदार वाद झाला. यात सांगण्यात आले की सिलेक्टर कमिटीचे अध्यक्ष अजित आगरकर यांना वाटत होते की विकेटकिपर म्हणून ऋषभ पंतला पहिलं प्राधान्य द्यावं. तर यावर गौतम गंभीरने सांगितले की चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विकेटकिपर म्हणून केएल राहुल ला प्रथम प्राधान्य दिले जाईल आणि यावर टीम मॅनेजमेंट कायम असेल. त्यानुसार इंग्लंड विरुद्ध सीरिजमध्ये ऋषभ पंतला सर्व सामन्यांमध्ये बेंचवर बसावे लागले आणि केएल राहुलला तिनही सामन्यात संधी मिळाली. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील ऋषभ पंत ऐवजी केएल राहुलला प्लेईंग 11 मध्ये संधी दिली जाण्याची शक्यता अधिक आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उप-कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, वॉशिंगटन सुंदर.
नॉन-ट्रॅवलिंग सब्स्टीट्यूट: यशस्वी जयस्वाल, मोहम्मद सिराज आणि शिवम दुबे