VIDEO : आर्थर रोड तुरुंगात बड्या धेंडांना मिळतेय खास वागणूक

मुंबईतल्या आर्थररोड जेलमध्ये काही कैद्यांना आणि आरोपींना खास वागणूक दिली जात असल्याचा गौप्यस्फोट जेलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल घुले यांनी केलाय. 

Updated: Apr 21, 2016, 02:27 PM IST
VIDEO : आर्थर रोड तुरुंगात बड्या धेंडांना मिळतेय खास वागणूक title=

मुंबई : मुंबईतल्या आर्थररोड जेलमध्ये काही कैद्यांना आणि आरोपींना खास वागणूक दिली जात असल्याचा गौप्यस्फोट जेलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल घुले यांनी केलाय. 

सध्या आर्थर रोड जेलमध्ये असलेले आरोपी आमदार रमेश कदम यांच्यासह अनेकांना खास वागणूक दिली जात असल्याचं घुलेंनी नमूद केलंय.

तसंच याप्रकरणी तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी कदमांनी दिल्याचा आरोपही घुले यांनी केलाय. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून कदमांची तक्रार केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.