बकरी ईदबाबत इरफान खानचं वादग्रस्त वक्तव्य

बॉलीवूड अभिनेता इरफान खाननं बकरी ईदबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

Updated: Jun 30, 2016, 07:14 PM IST
बकरी ईदबाबत इरफान खानचं वादग्रस्त वक्तव्य  title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेता इरफान खाननं बकरी ईदबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. कुर्बानीचा अर्थ आपल्याला आवडत्या गोष्टी कुर्बान करणं असा आहे. बाजारातून दोन बकरे विकत आणायचे आणि त्यांची कुर्बानी द्यायची असा त्याचा अर्थ नाही, असं इरफान म्हणाला आहे. 

जर तुम्हाला त्या बकऱ्याबद्दल काहीच घेणदेण नसेल तर ती कुर्बानी कशी, यामुळे कोणती दुवा मिळते असा सवालही इरफान खाननं विचारला आहे. प्रत्येकानं स्वत:लाच विचारावं की कोणाचा जीव घेतल्यानं पुण्य कसं मिळतं अशी प्रतिक्रिया इरफाननं दिली आहे. 

सलमाननं बलात्कारी महिलेबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबतही इरफाननं प्रतिक्रिया दिली आहे. सेलिब्रिटीही माणूस असतो. सेलिब्रिटींना महान आत्मा समजू नका, त्यांच्याकडूनही चूक होऊ शकते. याला एवढं गांभिर्यानं घेऊ नका असं इरफान म्हणाला आहे.