आग्रा येथे लागोपाठ दोन ठिकाणी स्फोट

उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये दोन ठिकाणी ब्लास्ट झाल्याच्या बातम्या येत आहेत. या धमाक्याने आग्रा हादरुन गेलं आहे. पहिला धमाका आग्रा कँट रेल्वे स्टेशनजवळ तर दुसरा धमाका एका घरात झाला आहे.

Updated: Mar 18, 2017, 11:45 AM IST
आग्रा येथे लागोपाठ दोन ठिकाणी स्फोट

आग्रा : उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये दोन ठिकाणी ब्लास्ट झाल्याच्या बातम्या येत आहेत. या धमाक्याने आग्रा हादरुन गेलं आहे. पहिला धमाका आग्रा कँट रेल्वे स्टेशनजवळ तर दुसरा धमाका एका घरात झाला आहे.

ज्या घरात धमाका झाला त्या घराच्या मालकाचं नाव अशोक आहे. या धमाक्यांमध्ये कोणीही जखमी झाल्याची माहिती अजून नाही मिळाली आहे. डीआयजी घटनास्थळी पोहोचले आहेत. काल रात्री भंडई रेल्वे ट्रॅकजवळ धमकीचं पत्र मिळाल्याची ही माहिती समोर येते आहे.

गृह मंत्रालयाने ताज महलवर दहशतवादी हल्ल्याचं सावट असल्याचा अलर्ट जरी केला होता. जगातील क्रूर दहशतवादी संघटना आयसीस कडून ताजमहलवर हल्ला करण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. पण त्याआधी आज २ धमाके झाल्याची बातमी समोर आली आहे.