ऑनलाईन प्रवेशाचं वेळापत्रक बोंबलले, अकरावी प्रवेश लांबणीवर

 ऑनलाईन प्रवेशाचं वेळापत्रक शाळांना न मिळाल्यानं अकरावी प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. शिक्षण विभागाकडून सूचना न आल्यानं विद्यार्थी,पालक संभ्रमात आहेत.

Updated: May 21, 2015, 11:35 PM IST
ऑनलाईन प्रवेशाचं वेळापत्रक बोंबलले, अकरावी प्रवेश लांबणीवर title=

मुंबई : ऑनलाईन प्रवेशाचं वेळापत्रक शाळांना न मिळाल्यानं अकरावी प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. शिक्षण विभागाकडून सूचना न आल्यानं विद्यार्थी,पालक संभ्रमात आहेत.

ऑनलाईन गोंधळ असल्याने यंदा अकरावीची प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडणार आहे. कारण ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रकच अजून शाळांना मिळालेलं नाही. प्रवेशाची पुस्तीकाही अद्याप शाळांपर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळं शाळा, विद्यार्थी आणि पालकही संभ्रमात आहेत. 

दरवर्षी दोन टप्प्यात ऑनलाइन प्रवेश होतोय. 15 मे पर्यंत पहिल्या टप्प्यातली प्रवेश प्रक्रिया पार पडते. मात्र यंदा मे महिना संपत आला तरी अद्याप वेळापत्रक आणि पुस्तीकांचा पत्ताच नाही. शिक्षण विभागाकडून याबाबत शाळांना कोणतीही सूचना देण्यात आलेली नसल्यानं संभ्रम वाढलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.