Mumbai Local Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर मेगाब्लॉक, आत्ताच जाणून घ्या

या मेगाब्लॉकदरम्यान जलद किंवा धिम्या मार्गावरील (Mumbai Local Mega Block)  रेल्वे वाहतूक काही तासांसाठी बंद असते. या मेगाब्लॉककाळात दुरुस्तीची कामं केली जातात.

Updated: Oct 29, 2022, 06:35 PM IST
Mumbai Local Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर मेगाब्लॉक, आत्ताच जाणून घ्या title=

Megablock : मुंबईत रविवारी 30 ऑक्टोबरला मध्य रेल्वेच्या (Central Railway) माटुंगा ते मुलुंड दोन्ही जलद मार्गावर आणि हार्बरच्या कुर्ला-वाशी दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक (Mumbai Local Mega Block) घेण्यात येणारे आहे. रविवारी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असणारेय. मात्र पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना मेगाब्लॉक नसल्यानं दिलासा मिळालाय.  मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर दर रविवारी पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर आवश्यकतेनुसार मेगाब्लॉक घेतला जातो. या मेगाब्लॉकदरम्यान जलद किंवा धिम्या मार्गावरील रेल्वे वाहतूक काही तासांसाठी बंद असते. या मेगाब्लॉककाळात दुरुस्तीची कामं केली जातात. (mumbai local mega block 30 november 2022 block on central and harbour railway know details)

असा असेल मेगाब्लॉक

मध्य रेल्वेवरील माटुंगा-मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. छशिमटवरुन 30 ऑक्टोबरला सकाळी  10.25 ते दुपारी 3.35 पर्यंत डाउन जलद मार्गावरील रेल्वे सेवा माटुंगा- मुलुंडमध्ये डाउन धीम्या मार्गावर वळवल्या आहेत. ठाण्यापलीकडे  या जलद गाड्या पुन्हा डाउन जलद मार्गावर वळवल्या जातील. तसेच निर्धारित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने पोहोचतील, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.

ठाणे येथून सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप जलद सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार स्थानकांवर थांबवल्या जातील. त्यापुढे या अप जलद सेवा अप जलद मार्गावर वळविल्या जातील आणि नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी  पोहोचतील.

कुर्ला आणि वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी  4.10 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. दरम्यान ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कुर्ला आणि पनवेल- वाशी या भागांत विशेष सेवा चालवल्या जातील. तसेच ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे- वाशी/नेरूळ स्थानकावरून सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे.