शाळेबाबत महत्वाची बातमी, आता ठाणे जिल्ह्यातील शाळा बंद

Thane Munincipal Corporation : मुंबई पाठोपाठ आता ठाण्यात पहिली ते नववीपर्यंतच्या शाळा ( School) 31 जानेवारीपर्यंत बंद राहणार आहेत. 

Updated: Jan 4, 2022, 08:21 AM IST
शाळेबाबत महत्वाची बातमी, आता ठाणे जिल्ह्यातील शाळा बंद title=
संग्रहित छाया

ठाणे : Thane Munincipal Corporation : मुंबई पाठोपाठ आता ठाण्यात पहिली ते नववीपर्यंतच्या शाळा ( School) 31 जानेवारीपर्यंत बंद राहणार आहेत. राज्यासह मुंबईत कोरोनाच्या (Corona) दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर शाळा बंद करण्यात आल्या आहेत. केवळ दहावी-बारावीचेच वर्ग भरणार आहेत. तसेच उर्वरित राज्यातील शाळा मात्र पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहेत.

शिक्षकाची कोरोना रॅपिड टेस्ट पाझिटिव्ह, तीन दिवस शाळा बंद

मुंबई, ठाणे वगळता इतर भागातील शाळा सुरूच ठेवण्याची भूमिका राज्याच्या शिक्षण विभागाने घेतली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर राज्यातील शाळा आणि लसीकरणाचा आढावा घेतला त्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला. 

Mumbai School  मुंबईत कोरोनाच्या (Corona) दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने (Mumbai Munincipal Corporation) शाळांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील पहिली ते नववीपर्यंतचे ( School) आणि 11 वीचे वर्ग 31 जानेवारीपर्यंत बंद करण्यात येत असल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. दहावी आणि बारावी परीक्षा असल्यामुळे ते वर्ग सुरु राहतील.

दरम्यान, 31 जानेवारीपर्यंत ऑफलाईन शाळा (Offline School) बंद असल्या तरी ऑनलाईन शाळा (Online School) सुरु राहाणार आहेत. मुंबई महापालिका अंतर्गत येणाऱ्या शाळांसाठी हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

मुंबई आणि ठाणे परिसर वगळता राज्यातील इतर भागात कोराना रुग्णांची संख्या कमी असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.