मासिक पाळीदरम्यान महाशिवरात्रीचा उपवास कसा ठेवायचा? जाणून घ्या याचे नियम

Mahashivratri 2025 : महिलांना नेहमी हा प्रश्न पडतो की जर महाशिवरात्रीच्या दिवशी पाळी आल्यास उपवास ठेऊ शकतो की नाही? याबाबत विस्तृतपणे जाणून घेऊयात. 

पुजा पवार | Updated: Feb 25, 2025, 02:51 PM IST
मासिक पाळीदरम्यान महाशिवरात्रीचा उपवास कसा ठेवायचा? जाणून घ्या याचे नियम
(Photo Credit : Social Media)

Mahashivratri 2025 : महाशिवरात्री हा हिंदू सनातन धर्मातील एक मोठा उत्सव असून संपूर्ण भारतात लोकं हा साजरा करतात. यंदा महाशिवरात्री 26 फेब्रुवारी राजी आली असून यादिवशी अनेक श्रद्धालु उपवास ठेवतात. परंतू महिलांना नेहमी हा प्रश्न पडतो की जर महाशिवरात्रीच्या दिवशी पाळी आल्यास उपवास ठेऊ शकतो की नाही? याबाबत विस्तृतपणे जाणून घेऊयात. 

मासिक पाळीदरम्यान महाशिवरात्रीचं उपवास ठेऊ शकतो का? 

जर महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास ठेवलेला असताना त्याच दिवशी जर पाळी आली तर महिलांनी हा उपवास अर्धवट ठेऊ नये. परंतु जर उपवास धरण्यापूर्वी पाळी आली असेल तर तुम्ही उपवास न पकडणेच योग्य ठरेल. परंतु तरीही जर तुम्हाला हा उपवास ठेवायचा असेल तर लक्षात ठेवा की मासिक पाळी आलेली असताना पूजा करणं टाळा. यादरम्यान तुम्ही मनातल्या मनात देवाची आराधना पूजा करू शकता. परंतु पूजेच्या सामानाला स्पर्श करू नये असे तज्ज्ञांनी सांगितले. शिव भक्तीसाठी मनाची शुद्धता अधिक गरजेची असते. म्हणून तुम्ही मनात देवाची भक्ती करत राहायला हवं. 

मासिक पाळी दरम्यान पूजा करशी करावी? 

मासिक पाळी दरम्यान स्त्रियांनी महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये प्रत्यक्ष सहभाग घ्याचा नाही. तुम्ही तुमच्या ऐवजी कोणा इतरांकडून पूजा करून घेऊ शकता. यादरम्यान देवाची मूर्ती, पूजा सामग्री आणि नैवद्य इत्यादींचा स्पर्श करू नका. पूर्ण श्रद्धेने मनात शंकराचं नाव घ्या आणि महादेव मंत्राचा जप करा. 

हेही वाचा : महाशिवरात्रीच्या उपवासाला बनवा कच्च्या केळ्याचे कटलेट, संपूर्ण कृती आणि साहित्य वाचा

 

मासिक पाळी दरम्यान किती दिवसांनी पूजा करू शकतो? 

असं म्हटले जातं की मासिक पाळीच्या 5 व्या दिवसांनंतर केस धुवून महिला पूजा करू शकतात. ज्या महिलांची मासिक पाळी ही दोन ते तीन दिवसच चालते त्या महिला चौथ्या दिवशी पूजेमध्ये सामील होऊ शकतात. तर ज्या महिलांची पाळी ही सात दिवस चालते त्यांनी आठव्या दिवशी केस धुवून पूजा करू शकता. तसेच महत्वाची पूजा असल्यास महिला पाळीच्या पाच दिवसांनी सर्व पूजा कार्यामध्ये सामील होऊ शकतात. 

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)