Railway Recruitment : रेल्वेत नोकरीची सुवर्ण संधी, आत्ताच करा अर्ज

या पदांसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 जुलै 2022 आहे.

Updated: Jul 8, 2022, 10:05 PM IST
Railway Recruitment : रेल्वेत नोकरीची सुवर्ण संधी, आत्ताच करा अर्ज title=

मुंबई : रेल्वे भर्ती सेल, पश्चिम मध्य रेल्वे (WCR) ने स्टेशन मास्टर, स्टेशन कमर्शियल कम तिकीट आणि सीनियर क्लर्क कम टायपिस्ट, कमर्शियल कम तिकीट क्लर्क, अकाउंट्स क्लर्क कम टाईपराईटर, जूनियर क्लर्क कम टाइपिस्ट अशा विविध NTPC (नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी) पदांसाठी अर्ज मागवले आहेत. GDCE कोट्यातील पदांसाठी ही नोटीफिकेशन जारी करण्यात आली आहे. एनटीपीसी पदवीधर पदांसाठी एकूण 55 आणि एनटीपीसी 12 वी उत्तीर्ण पदांसाठी 66 जागा उपलब्ध आहेत.

सिंगल स्टेज कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT) त्यानंतर अॅप्टिट्यूड टेस्ट/टायपिंग स्किल टेस्ट देखील असेल.

या पदांसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 जुलै 2022 आहे.

शिक्षण

-स्टेशन मास्टर, सीनियर कमर्शियल कम तिकीट क्लर्क आणि सीनियर क्लर्क कम टायपिस्ट या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार पदवीधर असावा.
-दुसरीकडे, कमर्शियल कम तिकीट लिपिक, लेखा लिपिक सह टाईपिस्ट आणि कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार 12 वी पास असावा.

वयोमर्यादा

अनारक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा 18 वर्षांवरून 42 वर्षे ठेवण्यात आली आहे. तर दुसरीकडे, ओबीसी उमेदवारांसाठी 45 वर्षे आणि एससी एसटी उमेदवारांसाठी 47 वर्षे ठेवण्यात आली आहे.

वेतन

-स्टेशन मास्टर पदासाठी दरमहा 35 हजार 400 रुपये
-वरिष्ठ व्यावसायिक कम तिकीट लिपिक पदासाठी 29 हजार 200 रुपये
-वरिष्ठ लिपिक कम टायपिस्ट या पदासाठी 29 हडार 200 रुपये
-व्यावसायिक कम तिकीट लिपिक पदासाठी 21 हजार700 रुपये
-लेखा लिपिक सह टाईपिस्ट पदासाठी 19 हजार 900 रुपये
-कनिष्ठ लिपिक सह टाईपिस्ट पदासाठी 19 हजार 900 रुपये प्रति महिना.

या कामासाठी महत्वाच्या गोष्टी

सिंगल स्टेज कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT)
अभियोग्यता चाचणी / टायपिंग चाचणी (जेथे लागू असेल तेथे)
कागदपत्र पडताळणी / वैद्यकीय तपासणी