पूजा खेडकरमुळे दिव्यांगांवर शंका घेणं महिला IAS अधिकाऱ्याला महागात पडलं; थेट राष्ट्रीय...

Pooja Khedkar Case Police Complaint Against IAS officer: पूजा खेडकर प्रकरण चर्चेत असतानाच या महिला अधिकाऱ्याने केलेलं विधान आता तिच्या अंगलट येणार असं चित्र पाहायला मिळत आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 25, 2024, 11:01 AM IST
पूजा खेडकरमुळे दिव्यांगांवर शंका घेणं महिला IAS अधिकाऱ्याला महागात पडलं; थेट राष्ट्रीय... title=
थेट राष्ट्रीय मानवाधिकार कमिशनकडे तक्रार

Pooja Khedkar Case Police Complaint Against IAS officer: महाराष्ट्रातील वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) या दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणामुळे अडचणीत असतानाच आता आणखी एक महिला आयएएस अधिकाऱ्याविरुद्ध दिव्यांग प्रमाणपत्रावरुन पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र या महिला अधिकाऱ्याने पूजा यांच्याप्रमाणे कोणतेही बनावट कागदपत्रं बनवलेले नसून पूजा खेडेकर प्रकरणासंदर्भातून दिव्यांग प्रमाणपत्रासंदर्भात केलेल्या विधानामुळे तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

अडचणीत सापडली महिला अधिकारी

तेलंगणामधील वित्त आयोगाच्या सदस्या म्हणून कार्यरत असलेल्या स्मिता यांनी पूजा खेडेकर प्रकरण चर्चेत असतानाच 21 जुलै रोजी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन केलेल्या पोस्टमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. हा वादा आता थेट पोलिसामध्ये पोहोचला आहे. स्मिता यांच्याविरोधात पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. स्मिता यांनी आपल्या पोस्टमध्ये दिव्यांगांसाठी प्राशकीय सेवेमध्ये कोटा असावा का? असा प्रश्न विचारत या कोट्याची खरंच गरज आहे का? अशा पद्धतीचं भाष्य केलं होतं. आता याच विधानामुळे स्मिता अडचणीत सापडल्या आहेत. 

कोणी केली तक्रार?

स्मिता यांच्याविरोधात हैदराबादमधील इब्राहमपट्टणम पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. स्मित यांनी केलेलं विधान म्हणजे दिव्यांगांचा अपमान असल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे. विकलांगुला हक्कुला रक्षा पोर्ता समितीचे आंध्र प्रदेशचे अध्यक्ष जनगाय यांनी ही तक्रार नोंदवली आहे. 

नक्की वाचा >> Pooja Khedkar प्रकरणाला वेगळं वळण! विचारही करणार नाही एवढा घोळ; मोदी सरकारकडून घटस्फोटाच्या चौकशीचे आदेश

माजी अधिकाऱ्याने केली टीका

माजी प्रशासकीय अधिकारी बाला लाथा यांनी स्मिता यांच्यावर टीका केली असून त्यांचं विधान असंवेदनशील असल्याचं म्हटलं आहे. "स्मिता यांनी केलेलं वक्तव्य असवेदनशील, अमानवीय आणि दिव्यांगाबरोबर भेदभाव करणार आहे. त्यांनी केलेली सर्व विधानं फार अपमानकारक आहेत," असं बाला यांनी म्हटलं आहे. 

थेट मानवाधिकार कमिशनकडे टीका

आंध्र प्रदेशमधील विकलांगु कॉर्परेटीव्ह फायनान्स कॉर्परेशनचे माजी अध्यक्ष बाका ज्युडीसन यांनीही राष्ट्रीय मानवाधिकार कमिशनकडे स्मिता यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच मानवी संसधान आणि प्रशिक्षण विभागाकडेही तक्रार दाखल करण्यात आली आहे. मानवाधिकार कमिशनने या तक्रारीची दखल घेतल्यास स्मिता यांच्याकडे कमिशन सदर प्रकरणाबद्दल स्पष्टीकरण द्यावं लागू शकतं. पोलीस तक्रार दाखल झाल्यामुळे स्मिता यांच्या विधानामुळे अडचणीत आल्याचं चित्र दिसत आहे.

या महिला अधिकारी नक्की काय म्हणाल्या?

"सध्या चर्चा सुरुच आहेत तर सर्व दिव्यांगांबद्दल संपूर्ण आदर बाळगत (मी हे लिहितेय) विमान कंपन्या अपंगत्व असलेल्यांना वैमानिक म्हणून नियुक्त करतात का? किंवा तुम्ही सुद्धा शस्त्रक्रिया करणारा डॉक्टर दिव्यांग असेल तर त्यावर विश्वास ठेवाल का?" असा सवाल स्मिता यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन विचारला आहे. "ऑल इंडिया सर्व्हिस (आयएसएस/पीआयएस/पीएफओएस) सारख्या सेवांमध्ये प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन, अनेक तास सतत काम करणं, लोकांच्या तक्रारी थेट त्यांच्याकडून ऐकून घेणं यासारखी कामं असतात. यासाठी शारीरिक क्षमता फिटनेस हवाच," असा युक्तीवादही स्मिता यांनी केला आहे.

नक्की वाचा >> Pooja Khedkar प्रकरणाला वेगळं वळण! विचारही करणार नाही एवढा घोळ; मोदी सरकारकडून घटस्फोटाच्या चौकशीचे आदेश

तसेच पुढे बोलताना स्मिता यांनी, "एवढ्या महत्त्वाच्या सेवा देणाऱ्या विभागामध्ये हा (दिव्यांग) कोटा का दिला जातो?" असा प्रश्न स्वत: आयएएस अधिकारी असलेल्या स्मिता यांनी विचारला आहे.

दिव्यांगाबद्दल द्वेष दर्शवणारं विधान

द नॅशनल प्लॅटफॉर्म फॉर राईट्स ऑफ डिसेबल्ड (एनपीआरडीने) संस्थेनं स्मिता यांच्या विधानावर प्रतिक्रिया नोंदवली आहे. एनपीआरडीचे सचिव मुरलीधरन यांनी हे विधान भेदभाव कऱणारं आणि दिव्यांगाबद्दल मनात द्वेष असल्याचं दर्शवणारं असल्याची टीका केली आहे.