Sohail Khan सोबतच्या घटस्फोटावर Seema Sajdeh नं सोडलं मौन?, वाचा काय म्हणाली

Fabulous Lives of Bollywood Wives चा दुसरा सीझन नेटफ्लिक्स इंडियावर 2 सप्टेंबरपासून सुरू होईल. 

Updated: Aug 28, 2022, 10:47 PM IST
Sohail Khan सोबतच्या घटस्फोटावर Seema Sajdeh नं सोडलं मौन?, वाचा काय म्हणाली title=

Sohail Khan & Seema Sajdeh Divorce: जवळपास २४ वर्षांच्या लग्नानंतर सलमान खानचा भाऊ सोहेल खानने (Sohail Khan) यावर्षी मे महिन्यात सीमा किरण सजदेहला (Seema Sajdeh) घटस्फोट दिला.

नीलम कोठारी सोनी (समीर सोनीची पत्नी), महीप कपूर (संजय कपूरची पत्नी) आणि भावना पांडे (चंकी पांडेची पत्नी) यांच्यासोबत नेटफ्लिक्स शो फॅब्युलस लाईव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हजमध्ये काम करणाऱ्या सीमाने म्हणजेच सोहेलच्या पहिल्या पत्नीने आपल्या घटस्फोटाबद्दल असलेलं मौन सोडलं असल्याची बातमी समोर येते आहे. सीमा आणि सोहेल यांना निर्वाण आणि योहान हे दोन मुलगे आहेत.

घटस्फोटाबद्दल बोलताना सीमाने एका मुलाखतीत सांगितले की, "मला कोणत्याही व्यक्तीमुळे जास्त तणावात राहयचं नाही. मी ज्या परिस्थिती आहे ती परिस्थिती एक खोल पोकळी आहे ज्यात आपणच वारंवार फिरत असतो. तेव्हा मला असं राहायचं नाही.''

फॅशन डिझायनर पुढे म्हणाले, "मी माझ्या आयुष्याकडे पूर्णपणे सकारात्मक कोनातून पाहत आहे. मी कोणतीही नकारात्मकता किंवा माझ्याकडे असलेली कोणतीही चांगली गोष्ट सोडली आहे. तसेच मला वाटते की मी अशा टप्प्यावर पोहोचले आहे जिथे मी आता कशाचीच काळजी करत नाहीये. जोपर्यंत या लोकांना हे माहीत आहे की मी कोण आहे तोपर्यंत मला काळजी नाही. माझे कुटुंब आहे. माझे आई-वडील आणि माझी मुलं आणि माझी भावंडं आहेत.

माझ्या आजूबाजूच्या लोकांसाठीही मी कोण आहे हे माहीत आहे आणि मी स्वतःशी प्रामाणिक राहते...'', अशी माहिती सीमानं दिली.

करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनचा Fabulous Lives of Bollywood Wives चा दुसरा सीझन नेटफ्लिक्स इंडियावर 2 सप्टेंबरपासून सुरू होईल.