नशिब पालटलं! ज्या शोमधून दाखवला बाहेरचा रस्ता, तिथंच आज 'ही' लोकप्रिय गायिका आहे Judge

Neha Kakkar Birthday: आज बॉलिवूडमध्ये आपल्याला नाना तऱ्हेचे संगीत ऐकायला मिळते आहे. त्यातून नव्या दमाच्या कलाकारांच्या गाण्यांचीही आजची तरूणाई ही फॅन आहे. गेल्या काही वर्षांपासून चर्चा आहे ती लोकप्रिय गायिका नेहा कक्कर हिची. आज तिचा 35 वा वाढदिवस आहे. तेव्हा जाणून घेऊया तिच्या आजपर्यंतच्या प्रवासाबद्दल. 

गायत्री हसबनीस | Updated: Jun 6, 2023, 12:58 PM IST
नशिब पालटलं! ज्या शोमधून दाखवला बाहेरचा रस्ता, तिथंच आज 'ही' लोकप्रिय गायिका आहे Judge title=
June 6, 2023 | Neha kakkar birthday special getting rejected from the reality show to becoming the judge of the same show know neha kakkar struggle story (Photo: Zee News)

Neha Kakkar Birthday: बॉलिवूड हे असं विश्व आहे जिथे कोणाचे नशीब कसं पलटेल काहीच सांगता येत नाही. परंतु आपली कला, आत्मविश्वास आणि मेहनत यांच्या आधारे आपण आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी साध्य करू शकतो फक्त त्यासाठी आपल्याला सकारात्मक राहणं आवश्यक असते. संगीत हा बॉलिवूडचा श्वास आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. या क्षेत्रातला गेल्या 80 वर्षांत अनेक नामवंत संगीतकार भेटले आहेत. आजच्या पिढीतही असे अनेक कलाकार आणि संगीतकार आहेत ज्यांच्या आवाजानं लाखो चाहते त्यांच्या गाण्यांच्या प्रेमात आहेत. त्यातली अशीच एक कलाकार आहे ती म्हणजे नेहा कक्कर. आज नेहाचा वाढदिवस आहे. एकेकाळी ज्या रिएलिटी शोमधून तिला रिजेक्ट केले होते त्याच सिगिंग रिएलिटी शोचं ती जजिंग करते आहे. 

नेहा कक्करची सख्खी बहीण सोनू कक्कर ही देखील एक लोकप्रिय गायिका आहे. नेहा कक्करचा आज 35 वा वाढदिवस आहे. पंजाबी गाण्यांपासून ते पॉप आणि बॉलिवूड अशा अनेक सुपरहीट गाण्यांना तिनं आवाज दिला आहे. 2014 साली आलेल्या यारियां या चित्रपटातील दिल हैं सनी सनी हे गाणं विशेष गाजलं होतं. त्यानंतर तिची बरीच चर्चा रंगली होती. आज तिच्या नावावर अनेक लोकप्रिय गाणी आहेत. परंतु या स्थानावर पोहचण्यासाठी तिचा संघर्ष काही सोप्पा नव्हता. त्यासाठी तिला मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागला आहे ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. तिनं वयाच्या 4 वर्षापासून गाणं शिकायला सुरूवात केली आहे. त्यानंतर तिनं मागे वळून पाहिलं नाही. तिनं बऱ्याच सिगिंग रिएलिटी शोसाठी ऑडिशन दिलं आहे आणि आपल्या करिअरची सुरूवात केली. 

हेही वाचा - Ashok Saraf शर्टाची दोन बटणं कायम उघडी का ठेवायचे? खुद्द मामांनीच केलेला खुलासा

नेहा ही ऋषिकेशमध्ये राहत होती. तरूण वयातच तिनं आपल्या घरीच परिस्थिती पाहता सर्व जबाबदाऱ्या आपल्या खांद्यावर उचलायला सुरूवात केली होती. आपलं घर चालवण्यासाठी लहान वयातच तिनं गाणं गायला सुरूवात केली होती. तेव्हा नेहा आपल्या भावंडांसोबत दिल्लीच्या परिसरात जागरणासाठी गाणी गायची. तेव्हा ती ऋषिकेशमध्ये एका खोलीतच राहायची. त्यावेळी नेहासोबत त्या एका खोलीत तिचे आईवडील आणि भावंडंही राहायचे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

इंडियन आयडलच्या दुसऱ्या पर्वासाठी नेहानं ऑडिशन दिली होती. तेव्हाचे जज अनु मलिक यांनी तिला रिजेक्ट केले होते. एकेकाळी एका खोलीत राहणारी नेहा आज मोठमोठ्या बंगल्यांची मालकीण आहे. तिच्याकडे महागड्या गाड्याही आहेत. त्यात ऑडी, मर्सिडिज बेंज, रेंज रोवर, बीएमडब्ल्यू असे गाड्यांचे कलेक्शन आहे. ज्या रिेएलिटी शोमधून तिला रिजेक्ट केले होते त्याच रिएलिटी शोचं ती जजिंग करते आहे. 'सेकेंड हॅण्ड जवानी', 'लडकी आंखं मारे', 'आओ राजा' अशी अनेक लोकप्रिय गाणी गायली आहेत.