भाऊ आमिर खानवर करिअर संपवण्याचा आरोप, 23 वर्षांनंतर 'मेला' फेम अभिनेता इतका बदलला, ओळखणंही कठिण

Faisal Khan Video: अभिनेता आमिर खान याची मुलगी आयरा खानच्या लग्नसोहळ्याची सध्या चर्चा आहे. आयराच्या लग्नसोहळ्यात तिचा काका फैजल खानने हजेरी लावली. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 15, 2024, 11:48 AM IST
भाऊ आमिर खानवर करिअर संपवण्याचा आरोप, 23 वर्षांनंतर 'मेला' फेम अभिनेता इतका बदलला, ओळखणंही कठिण  title=
Mela Film Actor Faisal Khan Look Changed In 23 Years watch video

Faisal Khan Video: तुम्हाला  मेला चित्रपट आठवतोय का? 2000 साली आलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या चित्रपटात आमिर खान त्याचा भाऊ फैजल खान आणि ट्विंकल खन्नाहे देखील या चित्रपटात होते. 1.8 कोटींचे बजट असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली होती. या चित्रपटाने 21 कोटींचा गल्ला जमवला होता. आता या चित्रपटाला 23 वर्षांहून अधिक वर्षे झाली आहेत. अलीकडेच आमिर खानच्या लेकीचा लग्नसोहळा मोठ्या थाटात पार पडला. यावेळी अभिनेता फैसल खानला पाहून अनेकांच्या या चित्रपटाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. 23 वर्षांनंतर फैजल खान माध्यमांसमोर आला होता. त्यामुळं त्याला ओळखणेही कठिण झाले होते. 

गेल्या काही दिवसांपासून आमिर खानच्या लेकीचा लग्नसोहळा चर्चेत आहे. त्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मुंबईत कोर्ट मॅरेज केल्यानंतर आयरा आणि नुपुर शिखरेने उदयपूरमध्येही लग्न केले. तर, मुंबईत त्यांचे रिसेप्शन पार पडले. या रिसेप्शनचे अनेक फोटो व्हिडिओ व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडिओ फैजल खान याचाही व्हायरल होतोय. आमिर खानचा मुलगा जुनैद खानसोबत पॅपाराझीला पोझ देतना दिसत आहे. याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर चाहत्यांनी रिअॅक्शन दिल्या आहेत. एका युजरने म्हटलं आहे की, मेला चित्रपटातील अभिनेता अजूनही डॅशिंग आणि हँडसम आहे. तर, अन्य एका युझरने म्हटलं आहे की, तो खूपच हँडसम दिसतोय. तर, एकाने म्हटलं आहे की,  फैजलने त्याच्या मस्क्युलर बॉडी आणि गुड लुक्सने आमिर खानचा भाव कमी केला होता. तर, अनेकांनी विचारलं आहे की, मेला -2 कधी येईल. 

फैजलच्या चित्रपटाबाबत बोलायचे झाल्यास, फैजलची अभिनयात एन्ट्री तो तीन वर्षांचा असतानाच झाली होती. फैजलचे काका नासिर हुसैन यांच्या 1969मध्ये आलेल्या प्यार का मौसम या चित्रपटात त्यांने बालकलाकार म्हणून काम केले होते. या चित्रपटात त्याने शशि कपूरच्या बालपणीची भूमिका साकारली होती. त्यानंतर फैजलने आमिर खानच्या 1988 मध्ये आलेल्या ब्लॉकब्लास्टर चित्रपट कयामत से कयामतमधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. 

दरम्यान, फैजल खान याने भाऊ आमिर खानवर अनेक गंभीर आरोप केले होते. इतंकच नव्हे कर, त्यांनी दावा केला होता की आमिरने त्यांला मानसिकरित्या कमकुवत असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळं या दोन्ही भावंडांबाबत अनेक चर्चा सातत्याने येत होत्या. दोघांमध्ये वाद असल्याच्या चर्चाही होत्या. मात्र, आता आयराच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये फैजल दिसल्याने दोघांमधील वाद मिटले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.