मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री आणि एक्स मिस युनिव्हर्स सुष्मिता सेनची वहिनी चारू असोपा सध्या आयुष्याच्या अत्यंत वाईट टप्प्यातून जात आहे. पतीपासून विभक्त झाल्यामुळे चारू आजकाल एकटी आपल्या मुलीचे संगोपन करत असताना आता तिच्या मुलीची प्रकृतीही बिघडली आहे. स्वतः चारूने आपल्या व्लॉगमध्ये ही माहिती दिली आहे. चारूचा हा व्लॉग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
चारूने व्लॉगमध्ये मुलीच्या तब्येतीची माहिती दिली
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, चारू खूप अस्वस्थ दिसत आहे आणि मुलीच्या तब्येतीबद्दल सांगत आहे. चारू सांगतेय की, तिच्या मुलीला थ्रोट इंफ्केशन झालं आहे, त्यामुळे मुलीने पाणी पिणे बंद केलं आहे. चारूने सांगितले की, तिच्या मुलीला उलट्या होतायेत आणि तापही येत आहे. यानंतर अभिनेत्रीने तिला औषध दिलं, त्यानंतर मुलीची तब्येत थोडी बरी झाली आहे.
खूप अस्वस्थ आहे मुलगी
यासोबतच चारूने व्हिडिओमध्ये असंही सांगितलं की, प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुलीला रात्री झोप येत नव्हती आणि ती खूप जोरात रडत होती. अशा परिस्थितीत सगळ्यात आधी चारू आपल्या मुलीला घराखाली फिरायला घेऊन गेली आणि नंतर ती जेव्हा घरी परतली तेव्हा, तिची मुलगी पुन्हा जोरात रडू लागली. यानंतर चारूने रात्री तीन वाजता मुलीला कारमधून रस्त्यांवर फिरायला नेलं. यानंतर जियानाला थोडं बरं वाटू लागलं.
आजकाल चारू एकटीच मुलीची काळजी घेत आहे. चारू आणि राजीव एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. अशा परिस्थितीत, अभिनेत्रीचे व्लॉग्स पाहिल्यानंतर, ती आपल्या मुलीवर आणि करिअरवर लक्ष केंद्रित करत पुढे जात असल्याचं स्पष्ट होतं आहे. चारूच्या व्लॉग्सच्या कमेंटमध्ये, चाहते तिला धीर देत ती एक स्ट्राँन्ग स्त्री असल्याचं सांगतात.