Nobel Prize 2023: माउंगी बावेन्डी, लुईस ब्रूस, अॅलेक्सी एकिमोव्ह यांना रसायनशास्त्रातील नोबेल

 जगभरात सर्वात मानाच्या समजल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्कारांची घोषणा झाली आहे. रसायनशास्त्रातील नोबेल माउंगी बावेन्डी, लुईस ब्रूस, अॅलेक्सी एकिमोव्ह यांना मिळाले आहेत. 

Updated: Oct 4, 2023, 05:15 PM IST
Nobel Prize 2023: माउंगी बावेन्डी, लुईस ब्रूस, अॅलेक्सी एकिमोव्ह यांना रसायनशास्त्रातील नोबेल title=

Nobel Prize 2023: अमेरिकेतील तीन शास्त्रज्ञांना यंदाचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला आहे. माउंगी बावेन्डी, लुईस ब्रूस, अॅलेक्सी एकिमोव्ह अशी या तिघांची नावं आहेत. या तिघांनी क्वांटम डॉट्सचा शोध लावल्यामुळे त्यांना हा मान मिळाला आहे. क्वांटम डॉट्स ऐसे नॅनो पार्टिकल्स इतके सूक्ष्म असतात की त्यांचा आकारावरून त्यांचा गुणधर्म कळतो.

क्वांटम डॉट्सचा वापर सध्या संगणकाचे मॉनिटर आणि टीव्ही स्क्रीन यांना प्रकाश देण्यासाठी केला जातो. यात QLED तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. क्वांटम डॉट्सचा प्रकाश इतका तीक्ष्ण असतो की तो एखाद्या ट्यूमरवर टाकल्यास शस्त्रक्रिया करताना सर्जनला अतिशय स्पष्टपणे दिसून येतील. यातून अतिशय बारकाईने केले जाणारे काम सहज करता येणे शक्य आहे.

क्वांटम डॉट्सचा वापर कलर्ड लाईट बनवण्यासाठी सुद्धा केला जातो. नोबेल विजेत्या शास्त्रज्ञांच्या मते, भविष्यात क्वांटम डॉट्स फ्लेक्सिबल इलेक्ट्रॉनिक्स, छोटे सेन्सर, पातळ सोलार सेल आण एन्क्रिप्टेड क्वांटम कम्युनिकेशन इत्यादींमध्ये मोठे योगदान देतील.

पोलोनियम शोधून काढणाऱ्या शास्त्रज्ञाला नोबेल

पोलंडमध्ये जन्मलेल्य मेरी क्यूरी यांनी आपले पती पियरे क्यूरी यांच्यासोबत मिळून असंख्य प्रकारचे शोध लावले. 1898 मध्ये दोघांनी रेडियम तत्व आणि पोलोनियमचा शोध लावला. या तत्वांचे शुद्ध नमुणे वेगळे करणे अतिशय कठिण प्रक्रिया होती. कित्येक टन कच्चे ओरपासून 1 डेसीग्राम रेडियम क्लोराईड काढण्यासाठी त्यांना चार वर्षे लागली. 

1911 मध्ये रेडियम आणि पोलोनियमचा अविष्कार करून क्यूरी यांना केमिस्ट्री अर्थात रसायनशास्त्रातील दुसरे नोबेल मिळाले होते. मेरी क्यूरी यांना पुरस्कार मिळाल्याच्या अवघ्या काही वर्षानंतर अमेरिकेने जपानवर दोन अणुबॉम्ब टाकले होते. क्यूरी अणुबॉम्ब बनवण्याच्या प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी नसल्या तरी नागासाकीवर फेकण्यात आलेल्या अणुबॉम्बच्या डिटोनेटरचा मुख्य घटक पोलोनियम होता.

भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार पियरे ऑगस्टीनी (Pierre Agostini),  फेरेंक क्राऊसज (Ferenc Krausz) आणि अॅन एल हुईलियर (Anne L’Huillier) यांना जाहीर झाला आहे. इलेक्ट्रॉन्सचा अतिशय सूक्ष्म पातळीवर अभ्यास केल्याबद्दल या तिघांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्यांच्या या संशोधनामुळे ब्रम्हांडाचा अभ्यास करण्याबरोबरच वैद्यकीय उपचार आणि निदान क्षेत्रात सुद्धा मोठा बदल घडेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कोरोना लस विकसीत करण्यासाठी संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार

हंगेरीचे  कॅटलीन कराकी (Katalin Karikó) आणि अमेरिका ड्र्यू वीसमन ( Drew Weissman) या दोन शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. यांनी कोरोना लस विकसीत करण्यासाठी mRNA वर संशोधन केले. कॅटलीन कराकी आणि अमेरिका ड्र्यू वीसमन यांनी विकसीत केलेल्या mRNA तंत्रज्ञानाच्या मदतीने कोरोनासी लस विकसीत करण्यात आली.