बुर्ज खलिफा इमारतीमधील लिफ्टचा स्पीड पाहून चक्कर येईल! फक्त 59 सेकंदात...

Burj Khalifa Lift : बुर्ज खलिफा ही  जगातील सगळ्यात उंच इमारत आहे. जगातील वेगवान लिफ्ट या इमारतीत आहे. लिफ्टचा स्पहीड पाहून चक्कर येईल.

वनिता कांबळे | Updated: Feb 4, 2025, 11:44 PM IST
बुर्ज खलिफा इमारतीमधील लिफ्टचा स्पीड पाहून चक्कर येईल! फक्त 59 सेकंदात...  title=

Burj Khalifa World Tallest Building : दुबईतील  बुर्ज खलिफा ही  जगातील सगळ्यात उंच इमारत आहे. तसेच बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात महागडी इमारत म्हणूनही ओळखली जाते. 163 मजल्यांची बुर्ज खलिफा ही इमारत ही थेट गगनाला भिडणारी आहे. या इमारतीची विशेषतः म्हणजे बुर्ज खलिफाची उंची एवढी आहे की तुम्ही ती नव्वद किलोमीटर अंतरावरूनही ही इमारत दिसते. बुर्ज खलिफा इमारतीत असलेल्या लिफ्ट देखील जगातील सर्वात वेगवान लिफ्ट आहे. बुर्ज खलिफा इमारतीमधील लिफ्ट ही रॉकेटच्या स्पीडने वर जाते. ही लिफ्ट 59 सेकंदात 124 माळ्यावर पोहचते. जाणून घेऊया बुर्ज खलिफा इमारतीमधील लिफ्टचा स्पीड नेमका किती आहे. 

बुर्ज खलिफा पर्यटकांचे ड्रीम डेस्टिनेशन आहे. बुर्ज खलिफा इमारत इस्लामिक स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे.  बुर्ज खलिफामध्ये 58 लिफ्ट आहे. बुर्ज खलिफामध्ये 2957 पार्किंग स्पेस आणि 900 अपार्टमेंट आणि 304 हॉटेल्स आहे. बुर्ज खलिफा इमारतीची लिफ्ट देखील तितकीच खास आहे. ओटिस कंपनीने बुर्ज खलिफामध्ये लिफ्ट बनवल्या आहेत. या लिफ्टमध्ये एकाच वेळी 12 ते 14 लोक जाऊ शकतात. इमारत सेवा तसेच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांसाठी बसवण्यात आलेली लिफ्ट एका वेळी 5500 किलो सामान वाहून नेऊ शकते. ही जगातील सर्वात उंच सर्व्हिस लिफ्ट आहे. यासह बुर्ज खलिफामधील ही जगातील तिसऱ्या क्रमाकांची वेगवान लिफ्ट आहे. 

बुर्ज खलिफामधील लिफ्ट दहा मीटर प्रति सेकंद वेगाने हलते. ताशी 36 किमी वेगाने ही लिफ्ट वर जाते.  या लिफ्टला इमारतीच्या 124 व्या मजल्यावर असलेल्या 'अ‍ॅट द टॉप' या डेकवर पोहोचण्यासाठी फक्त दोन मिनिटे लागतात. 'अ‍ॅट द टॉप' या डेकवरुन दुबई शहराचे विहंगम दृष्य पहायला मिळते. 

हे देखील वाचा... बुर्ज खलिफा कुणाच्या नावावर आहे? जगातील सगळ्यात उंच इमारतीच्या मालकाचे नाव जाणून शॉक व्हाल

जगात आणखी अशा दोन इमारती आहेत ज्यांचा लिफ्टचा वेग बुर्ज खलिफा पेक्षा जास्त आहे. तैवानमध्ये तैपेई नावाची एक इमारत आहे जिथे जगातील सर्वात वेगवान लिफ्ट आहे. ही इमारत ५०९ मीटर उंच आहे. त्यामध्ये बसवलेल्या लिफ्टचा वेग १०१० मीटर/मिनिट आहे. याचा अर्थ या लिफ्टचा वेग ताशी 60.6 किमी आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर योकोहोमा लँडमार्क टॉवर येतो. ही इमारत 296 मीटर उंच आहे. त्यामध्ये बसवलेल्या लिफ्टचा वेग 750 प्रति मिनिट आहे. म्हणजेच या लिफ्टचा स्पीड ताशी 45 किमी इतका आहे.