छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्याचा जाहीर माफीनामा; 4 मिनिटांच्या व्हिडिओत हात जोडले आणि...

Rahul Solapurkar: छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या दैदिप्यमान कारकिर्दीत अनेक मोहिमा फत्ते केल्या. त्यातीलच यांच्या आग्र्यातला सुटकेचा प्रसंग इतिहासात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आपल्या बुद्धिचातुर्याच्या जोरावर त्यांनी शिताफीन आग्रा येथून आपली सुटका करून घेतली. पण याबाबत एका अभिनेत्याने महाराज लाच देऊन सुटले असं म्हणत वादग्रस्त वक्तव्य केलंय. राहुल सोलापुरकर यांच्या या बेताल बडबडीवर आता टीकेची झोड उठली आहे. यानंतर त्यांनी जाहीर माफी मागितली आहे. 

वनिता कांबळे | Updated: Feb 4, 2025, 11:02 PM IST
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्याचा जाहीर माफीनामा; 4 मिनिटांच्या व्हिडिओत हात जोडले आणि...   title=

Rahul Solapurkar On Chatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज फक्त आपल्या महाऱाष्ट्रासाठी नाही तर अख्या देशाचं दैवत आहेl. मात्र, याच शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेबाबत, मुख्य प्रवाहापासून काहिसे दूर गेलेले अभिनेते राहुल सोलापुरकर यांनी अतिशय घृणास्पद वक्तव्य केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्र्यातून सुटून आले होते. असं राहुल सोलापूरकर यांनी म्हंटल आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं त्यांच्यावर जोरदार टीका झाली. यानंतर राहुल सोलापूरकर यांनी सोशल मिडियावर जाहीर माफी मागितली. राहुल सोलापूरकर यांनी फेसबुकवर 4 मिनिटांचा व्हिडिओ शेअर केला आहे. 

राहुल सोलापूरकर नेमकं काय म्हणाले होते?

पेटारे-बिटारे काहीच नव्हतं.  शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्याहून सुटले होते. त्यासाठी त्यांनी हुंडी वटवली याचे पुरावे आहेत.  महाराजांनी औरंगजेबाचा वकील, त्याच्या बायकोला लाच दिली होती.  औरंगजेबाच्या सरदाराकडून सही-शिक्क्याचं पत्र महाराजांनी घेतलं होतं.  त्याच्याकडून घेतलेला परवाना दाखवून शिवाजी महाराज आग्र्यातून बाहेर पडले.  सर्वात शेवटी स्वामी परमानंद 5 हत्ती घेऊन आग्र्यातून बाहेर पडले. त्याची खूण, पुरावे आहेत. परमानंदांकडे देखील परवानगी होती.  मात्र हा सगळा इतिहास गोष्ट स्वरुपात सांगायचा म्हंटलं, की थोडे रंग भरून सांगावं लागतं. मात्र रंजकता आली, की इतिहासाला छेद दिला जातो असं वादग्रस्त वक्तव्य अभिनेते राहुल सोलापुरकर यांनी केले आहे. 

राहुल सोलापूरकर यांच्या या विधानावर नेत्यांनी आता टीका करत इतिहासाचं विकृतीकरण करण्याचा हा प्रयत्न असल्याचं म्हंटलय...फडणवीस आणि भाजपला जर शिवाजी महाराजांबद्दल सन्मान असेल तर राहुल सोलापूरकर ही विकृती आहे त्याच्यावर कारवाई करा अशी मागणी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. तर इतिहासाचं विकृतीकरण करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटद्वारे केला. तर छगन भुजबळ, सुनिल तटकरे यांनी राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्याचा निषेध करत अशी विकृत मनोवृत्ती ठेचून काढायला पाहीजे,असं म्हंटल आहे. 

बुद्धिचातुर्य, धैर्य, गनिमा कावा या गुणांनी आणि महाराजांच्या डावपेचांनी स्वराज्याला नेहमीच शत्रुंपासून सुरक्षित ठेवलं. आग्र्यात औरंगजेबाने महाराजांना कैदेत ठेवलं. मात्र, महाराज पेटाऱ्यात बसून सफाईदारपणे बाहेर पडले. महाराजांच्या आयुष्यात घडलेल्या घटना आजही अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहेत. त्यामुळे अशी बेताल वक्तव्य करणाऱ्यांनी एकदा इतिहास जरूर वाचवा.

हे देखील वाचा... कोकणातील राजेशाही पर्यटनस्थळ! परदेशी राजाला नजरकैदेत ठेवण्यासाठी बांधलेला महाराष्ट्रातील अलिशान राजवाडा