Uday Samant : मुंबईत कोकण उद्योग परिषदेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी कोकणच्या विकासासाठी आम्ही सदैव तत्पर असून कोकणाला चांगले दिवस येत असतील तर निधीची व्यवस्था करण्याचं आश्वासन उद्योगमंत्री मंत्री उदय सामंत यांनी दिलं.. तर कोकणचा शाश्वत विकास करणं गरजेचं असल्याचं मत झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार यांनी व्यक्त केलंय. कोकण भूमी प्रतिष्ठान, ग्लोबल कोकण आणि समृद्ध मराठी चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमानं या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचं नियोजन कोकण भूमी प्रतिष्ठानचे संस्थापक संजय यादवराव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं होतं.
जंगल संवर्धन, पर्यावरण माकड वानर आणि वन्य प्राणी समस्या सत्र, वने व पर्यावरण संवर्धनासाठी "स्वायत्त कोकण समिती" स्थापना, माकड व वन्य प्राणी समस्यांचे निवेदन, मत्स्यविकास, बंदर विकास व जल पर्यटनावर सत्र असे होते. उदयोग मंत्री उदय सामंत, शंभूराज देसाई , पर्यटनमंत्री भरत गोगावले यासाठी प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन कोकण भूमी प्रतिष्ठानचे संस्थापक संजय यादवराव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
उदयोग मंत्री उदय सामंत यांनी कोकणासाठी काय करायचे आणि काय केले आहे याची माहिती दिली. कोकणच्या विकासासाठी आम्ही नेहमी कोकणच्या मागे ठाम पणे आम्ही उभे राहू अशी ग्वाही दिली. कोकणात पर्यटन आणने गरजेचे आहे. माझ्या विभागात अनेक असे लाभ देणाऱ्या योजना आहेत त्याचा लाभ कोकणवासीयांना घेतला पाहिजे. तुम्ही स्वतः व्यवसाय करा. जागा आता विकू नका आम्ही सर्व सहकार्य करू असे आश्वासन गोगावले यांनी यावेळी दिले. पर्यावरण पूरक प्रकल्प आणणार. सेमी कंडक्टर चा पर्यावरण पूरक असा प्रकल्प आणला आहे. धीरूभाई अंबानी डिफेन्स प्रकल्प आणणारा आहे. कोकणच्या विकासासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत ,कधीही तयार आहोत असे उदय सामंत म्हणाले.