महाराष्ट्रात उभारणार लंडनला टक्कर देणारे पर्यटनस्थळ; समुद्र किनाऱ्यावर 800 फूट उंचीवर Mumbai Eye

 Mumbai Eye Project : ऐतिहासिक वास्तूंसाठी जगप्रसिद्ध असलेल्या इंग्लंडची राजधानी लंडन शहर सुमारे ८०० फूट उंचीवरून पाहायला मिळणार्‍या लंडन आयप्रमाणे मुंबईतही लवकरच ‘मुंबई आय’ सुरु करण्यात येणार आहे. मुंबई पर्यटनवाढीसाठी महापालिकेच्या नव्या योजनांमध्ये याची घोषणा करण्यात आलीय.

वनिता कांबळे | Updated: Feb 5, 2025, 12:01 AM IST
महाराष्ट्रात उभारणार लंडनला टक्कर देणारे पर्यटनस्थळ; समुद्र किनाऱ्यावर  800 फूट उंचीवर Mumbai Eye  title=

BMC Budget 2025 Mumbai Eye Project : महाराष्ट्रात लंडनला टक्कर देणारे पर्यटनस्थळ उभारले जाणार आहे. पर्यटकांना लंडन शहराचे सौंदर्य न्याहाळण्यासाठी बनवण्यात आलेल्या प्रसिद्ध लंडन आय च्या धर्तीवर 'मुंबई आय' उभारण्यात येणार आहे. यामुळे उंचावरुन मुंबई शहर न्याहाळण्याची सुविधा पर्यटकांना उपलब्ध होणार आहे. 

मुंबई पर्यटनवाढीसाठी महापालिकेच्या नव्या योजनांमध्ये या 'मुंबई आय'चा समावेश आहे. मात्र ज्या 'लंडन आय'च्या धर्तीवर मुंबईमध्ये 'मुंबई आय' उभारण्यात येणार आहे. यामुळे हे स्थळ मुंबईत येणाऱ्या पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरणार आहे. 

आहे काय 'लंडन आय

लंडन शहरात थेम्स नदीच्या किनारी असलेला अजस्त्र पाळणा आहे. सुमारे 800 फूट उंचीवरून लंडन शहराचे दर्शन होते. युनायटेड किंग्डममधील हे सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. सायकलच्या एखाद्या चाकासारखा दिसणारा असा हा पाळणा आहे.  पाळण्याला 25 पर्यटक बसू शकतील अशा 32 कॅपसुल्स आहेत.  दरवर्षी 35 लाख पर्यटक लंडन आय' भेट देतात

'लंडन आय'मधून संपूर्ण लंडन शहर एका नजरेत पाहू शकतो त्यामुळे लंडननंतर आता मुंबईतही सीलिंकच्या जवळ असलेल्या कास्टिंग यार्डच्या ठिकाणी वरळीहून बांद्र्याला जात असताना समुद्राच्या किनारी हे ‘मुंबई आय’उभारणार आहे...
'मुंबई आय' साकारण्यात आल्यास पर्यटकांचा ओढा मुंबईकडे वाढणार आहे. या 'मुंबई आय'मधून संपूर्ण मुंबईचे विहंगमय दृष्य पाहण्याची संधी पर्यटक आणि मुंबईकरांना उपलब्ध होणारय