टेलिव्हिजन रिअॅलिटी शो 'सा रे गा मा पा' 2024 च्या स्पर्धक श्रद्धा मिश्रा आणि मिनाक्षी यांनी युकेमधील दोन प्रतिष्ठित ठिकाणी लाईव्ह परफॉर्म करत भारतीय आणि भारतीय संगीताची मान अभिमानाने उंचावली आहे.
25 जानेवारी रोजी बीपी पल्स बर्मिंगहॅम आणि 26 जानेवारी रोजी लंडनमधील ओव्हीओ अरेना वेम्बली येथे त्यांनी प्रेक्षकांना आपल्या सूरांनी मंत्रमुग्ध केलं. 'सा रे गा मा पा' साठी हा एक मैलाचा दगड ठरला आहे. आपल्या स्पर्धकांना इतक्या प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर सादर करणारा हा पहिला भारतीय टेलिव्हिजन संगीत रिअॅलिटी शो बनला आहे.
पुनीत गोयंका यांच्या कुशल नेतृत्वाखाली झी युकेचे बिझनेस हेड पारुल गोयल यांनी संकल्पित केलेल्या या उपक्रमाने शोच्या स्पर्धकांसाठी हा उल्लेखनीय टप्पा गाठण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 'सा रे गा मा पा' शोला जागतिक व्यासपीठावर नेणं हा गोयल यांच्या दूरदर्शी दृष्टिकोनाचा उद्देश आहे.
धोरणात्मक वाटाघाटी आणि अढळ समर्पण या माध्यमातून गोयल यांनी बर्मिंगहॅम आणि वेम्बली येथील कार्यक्रम आयोजकांशी यशस्वीरित्या संवाद साधला, आणि 'सा रे गा मा पा' च्या कलाकारांच्या कौशल्याचं प्रभावीपणे प्रदर्शन केलं. झी ब्रँडसाठी असणारी योग्य समज त्यांनी दोन वर्षांपूर्वी 'सा रे गा मा पा' युकेसाठी विक्रमी 17 प्रायोजक मिळवून दाखवून दिली. ज्याने जागतिक स्तरावर झीचे महत्त्व बळकट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे झी मनोरंजन विश्वात आघाडीवर राहून चमकदार कामगिरी करत राहील याची खात्री होत आहे.
यूके भेटीचा भाग म्हणून श्रद्धा आणि पार्वती यांना 26 जानेवारी रोजी भारतीय उच्चायुक्ताच्या प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण समारंभात सादरीकरण करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी मान्यवर आणि पाहुण्यांच्या उपस्थितीत "परदेस - ये मेरा इंडिया" आणि "कर्मा - दिल दिया है जान भी देंगे" ही हृदयस्पर्शी गाणी सादर केली.
या यशस्वी कामगिरीवर भाष्य करताना झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेडचे सीईओ पुनीत गोएंका म्हणाले की, "ZEE मध्ये आम्ही प्रतिभेला अजून सक्षम करण्यावर, अडथळ्यांवर मात करुन भारतीय कलात्मकता आणि संस्कृती जागतिक स्तरावर प्रदर्शित करण्यावर विश्वास ठेवतो. लंडनमधील प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात, विशेषतः भारतीय उच्चायुक्तालयाच्या उपस्थितीत प्रतिष्ठित वेम्बली स्टेजवर आमच्या 'सा रे गा मा पा' स्पर्धकांनी केलेले अविश्वसनीय सादरीकरण या दूरदृष्टीचा पुरावा आहे".