Varun Chakaravarthy : भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात टी 20 नंतर आता 3 सामान्यांच्या वनडे सीरिजला सुरुवात होणार आहे. 6 फेब्रुवारी पासून या सीरिजचा पहिला सामना नागपूर येथील स्टेडियमवर खेळवला जाणार असून सामन्याच्या दोन दिवसांपूर्वी टीम इंडियाच्या संघात स्टार गोलंदाजांची एंट्री झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या टी 20 सीरिजमध्ये इंग्लंडच्या फलंदाजांचा धुव्वा उडवणाऱ्या गोलंदाज वरुण चक्रवर्ती वनडे सीरिजमध्ये देखील टीम इंडियाचा भाग असणार आहे. त्यामुळे इंग्लंड संघाची डोकेदुखी नक्कीच वाढणार आहे.
19 फेब्रुवारी पासून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ला सुरुवात होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाची ही शेवटची वनडे सीरिज असल्याने यात टीम इंडियाचे कशी कामगिरी करते हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांची टी 20 सिरीज टीम इंडियाने 4-1 ने आघाडी घेऊन जिंकली. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खाली भारताच्या युवा खेळाडूंनी इंग्लंडला धूळ चारली. यात गोलंदाज वरूण चक्रवर्ती याच्या फिरकीने महत्वाची भूमिका बजावली. वरूण चक्रवर्तीने इंग्लंड विरुद्ध राजकोट येथे झालेल्या सामन्यात तब्बल 5 विकेट्स घेतल्या. यासह त्याला संपूर्ण सीरिजमध्ये केलेल्या उत्तम कामगिरीमुळे प्लेअर ऑफ द सीरिजचा पुरस्कार सुद्धा मिळाला. वरूणने या इंग्लंड विरुद्ध टी 20 सीरिजमध्ये एकूण 14 विकेट्स काढल्या.
इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), हुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर ), ऋषभ पंत (विकेटकिपर ), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर , अक्षर पटेल, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद. शमी, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती.
Varun Chakaravarthy added to India’s squad for ODI series against England.
Details TeamIndia | INDvENG | IDFCFIRSTBank
— BCCI (BCCI) February 4, 2025
06 फेब्रुवारी 2025: भारत विरुद्ध इंग्लंड , पहिला वनडे (विदर्भ क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम, नागपुर)
09 फेब्रुवारी 2025: भारत विरुद्ध इंग्लंड, दूसरा वनडे (बाराबती स्टेडियम, कटक)
12 फेब्रुवारी 2025: भारत विरुद्ध इंग्लंड, तीसरा वनडे ( नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद)
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जाहीर करण्यात आलेला भारतीय संघ इंग्लंड विरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये खेळणार आहे. परंतु यात जसप्रीत बुमराह हा दुखापतीच्या कारणामुळे या सीरिजमध्ये खेळणार नाही. सध्या तो बंगळुरू येथील एनसीएमध्ये उपचार घेत असून तेथील डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहे. त्याच्या तब्येतीबाबत काही दिवसातच बीसीसीआयला रिपोर्ट केला जाईल अशी माहिती मिळाली आहे.