महाराष्ट्रातील डॉक्टरांचा चमत्कार! 3 दिवसांच्या बाळाच्या पोटातून काढली 2 बाळं, भारतात पहिल्यांदाच गुंतागुंतीचं ऑपरेशन

Buldhana News : बुलढाण्यातील पोटात अर्भक असलेल्या नवजात बालकावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांना जे दिसलं ते आश्चर्यचकीत करणारं होतं.

वनिता कांबळे | Updated: Feb 4, 2025, 09:55 PM IST
महाराष्ट्रातील डॉक्टरांचा चमत्कार!  3 दिवसांच्या बाळाच्या पोटातून काढली 2 बाळं, भारतात पहिल्यांदाच गुंतागुंतीचं ऑपरेशन title=

Buldhana Baby Opration : शासकीय हॉस्पिटल्समधील सेवेच्या दर्जावर कायम वेगवेगळे आरोप केले जातात. पण अमरावतीच्या संदर्भ रुग्णालयातील डॉक्टरांनी खूप गुंतागुंतींची शस्त्रक्रिया केलीय. एका तीन दिवसांच्या नवजात बालकाच्या पोटातून दोन अर्भकं शस्ज्ञक्रिया करुन काढण्यात आली आहेत. ही शस्त्रक्रिया म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील चमत्कार मानला जात आहे. 

बुलढाण्यातील गरोदर महिलेच्या पोटातील बाळाच्या पोटातही अर्भक असल्याचं कळलं. त्या बालकावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनानं घेतला. शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांना जे दिलसं ते धक्कादायक होतं. 3 दिवसांच्या बाळाच्या पोटात 1 नव्हे तर 2 अर्भकं होती. जवळपास 1 तास चाललेल्या या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी हे दोन्ही अर्भक बाळाच्या पोटातून बाहेर काढले. आणि या बाळाला जीवनदान दिलंय.

शस्त्रक्रियेसाठी बाळाला अमरावतीच्या विभागीय संदर्भ सेवा केंद्रात दाखल करण्यात आलं. जवळपास 10-12 डॉक्टर आणि नर्सच्या चमूने या बाळावर शस्त्रक्रिया केली. एका पुरुष जातीच्या बाळाच्या पोटातून अर्भक काढल्याची ही देशातील पहिलीच घटना असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

यशस्वी शस्त्रक्रिया करून आपल्य़ा बाळाला जीवनदान दिल्याने बाळाच्या वडिलांनी डॉक्टरांचे आभार मानलेत. या 3 दिवसांच्या बाळासाठी अमरावतीतील डॉक्टर देवदूत ठरलेत. अमरावतीच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळं सरकारी डॉक्टरांच्या या कामगिरीचं कौतुक केलं जातंय.