Historic Baramothachi Vihir In Satara : छत्रपती संभाजी महाराजांच्या धैर्य, पराक्रम, असमान्य शौर्य रुपेरी पद्यावर दाखवणारा छावा (Chhava) चित्रपट सध्या महाराष्ट्रात चांगलाच गाजत आहे. महाराष्ट्रातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचं असलेल्या सुंदर लोकेशन्सवर या चित्रपटाचे शुटींग झाले आहे. छावा चित्रपटातील लक्षवेधी सीन महाराष्ट्रातील 110 फूट खोल विहीरीत असलेल्या गुप्त राजवाड्यात शूट झालाय. जाणून घेऊया हे ठिकाण नेमकं कुठे आहे.
अभिनेता विकी कौशलने सिनेमात संभाजी महाराजांचा इतिहास आपल्या अभिनयाने मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. अभिनेता विकी कौशल याच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. चित्रपटात एका सीनमध्ये अभिनेता विकी कौशल एका मोठ्या शिवलिंगासमोर पूजा करताना दिसत आहे. चित्रपटाच्या ट्रेलमध्ये देखील हा सीन पहायला मिळतो. हा सीन जिथे शूट झालाय ती ऐतिहासीक वास्तू महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात आहे. बारा मोटेची विहीर असे या वास्तूचे नाव आहे.
गुप्त विहीरीत भव्य राजवाडा आहे. सातारा जिल्ह्यातील लिंब या गावामध्ये जवळपास ही अनोखी विहीर आहे. लिंब हे गाव साताऱ्यापासून 16 किमी आणि पुण्यापासून 19 किमी अंतरावर आहे. 300 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली ही ऐतिहासिक विहीर ही बारा मोटेची विहीर या नावाने ओळखली जाते. या विहिरीत चक्क एक महाल बांधण्यात आला. या विहीरीचे एणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गेल्या 300 वर्षात ही विहीर कधीही आटली नाही.
छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या पत्नी वीरूबाई यांच्या देखरेखीखाली या विहिरीचे बाधकाम पूर्ण झाले होते. 1719 ते 1724 या कालावधीत छत्रपती शाहू महाराजांच्या पत्नी वीरुबाई भोसले यांनी ही विहीर बांधली होती. 110 फूट खोल आणि 50 फूट व्यास असलेली ही विहीर आमराईला पाणी पुरवठा करण्यासाठी बांधण्यात आली. 3300 आंब्यांच्या झाडांना यातून पाणीपुरवठा करण्यासाठी ही विहीर खोदण्यात आली होती. या विहिरीतून पाणी उपसण्यासाठी एकावेळी 12 मोटा लावल्या जात. यामुळे ही विहीर बारा मोटेची विहीर या नावाने ओळखली जाते.
या विहीरीची वेगळी ओळख म्हणजे या विहीर एक भव्य राजवाडा आहे. या विहीरीचं सर्व बांधकाम हेमाडपंती आहे विहीर बांधताना दगड एकमेकांना जोडण्यासाठी चुना सिमेंट अशा कोणत्याही गोष्टीचा वापर करण्यात आलेला नाही. जमिनीखालील महालात ही विहीर बांधलेली आहे. महालाच्या मुख्य दरवाजावर कलाकुसर करण्यात आली आहे. महालात विविध चित्रे कोरण्यात आली आहेत. गणपती, हनुमान, कमलपुष्पे अशी अनेक शुभशिल्पे येथे पहायला मिळतात. हत्तीवर आणि घोड्यावर विराजमान झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प देखील ह्या खांबावर कोरलेले आहे. विहिरीला प्रशस्त असा जिना आणि चोरवाटा आहेत. बारा मोटीची इतिहास कालीन विहिर म्हणजे स्थापत्य शास्त्राचा अदभुत नमूना आहे.