नवीन चेतक लॉन्च : एकदा चार्ज केली की ९५ किमी मायलेज, किंमत पाहा

 'हमारा बजाज' हा शब्द पुन्हा ऐकायला मिळणार आहे. १४ वर्षांनंतर प्रसिद्ध ब्रँड चेतक बाजारात आणला आहे.  

Updated: Jan 14, 2020, 07:28 PM IST
नवीन चेतक लॉन्च : एकदा चार्ज केली की ९५ किमी मायलेज, किंमत पाहा title=

मुंबई : 'हमारा बजाज' हा शब्द पुन्हा ऐकायला मिळणार आहे. १४ वर्षांनंतर मोठ्या कालखंडानंतर, आज, १४ जानेवारी २०२० रोजी बजाजने आपला सर्वात प्रसिद्ध ब्रँड चेतक बाजारात आणला आहे. यावेळी कंपनीने चेतक इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणली आहे. त्याची सर्वात खास गोष्ट अशी आहे की एकदा चार्ज केली की ९५ किमी पर्यंत मायलेज देऊ शकते. ग्राहक केवळ २००० रुपयांत ही नवीन चेतक स्कूटर बुक करू शकतात.

नवीन चेतकची  किंमत

कंपनीने नवीन चेतकमध्ये जबरदस्त लूक आणला आहे. कंपनीने चेतकची एक्स-शोरूम किंमत १ लाख रुपये ठेवली आहे. तसेच बुकिंगची किंमत फक्त २००० रुपये आहे. नवीन स्कूटर पुणे आणि बंगळुरू येथे लॉन्च करण्यात आली आहे.

स्कूटरचे वैशिष्ट्ये 

या इलेक्ट्रिक स्कूटरची खास गोष्ट अशी आहे की ९५ किमी अंतर एकदा चार्ज केल्यावर कापणार आहे. या स्कूटरला एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत. तसेच डिजिटल मीटरही आहे. ही स्कूटर दमदार आणि स्टायलिश असणार आहे. स्कूटरचा लूक प्रीमियम आहे. रेट्रो लूक असणाऱ्या स्कूटरमध्ये कर्वी बॉडीवर्क, मल्टी स्पोक अलॉय व्हिल्स, स्विचगिअर, फुल एचडी लाइटिंग आणि डिजीटल कंसोल आहे. ही स्कूटर एका चार्जमध्ये ९५ किमी पर्यंत अंतर कापणार आहे, असा कंपनीचा दावा आहे. त्यामुळे पेट्रोलच्या तुलनेत ही स्कूटर खूपच स्वस्त आणि प्रदूषणमुक्त असणार आहे.

उत्पादन १४ वर्षापूर्वी बंद

बजाजचा एक अतिशय लोकप्रिय 'चेतक' स्कूटर ब्रॅन्ड आहे. या स्कूटरची विक्री तब्बल १४ वर्षानंतर करण्यात येत आहे. बजाज कंपनीने आपले उत्पादन १४ वर्षापूर्वी बंद केले होते. कंपनीच्या शेवटच्या दोन महिन्यांपासून ही नवीन स्कूटर लॉन्च करण्याची शक्यता होती. मात्र, कंपनीने १४ जानेवारीला बाजारात उतविण्याचा निर्णय घेतला होता. ही नवी कोरी इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात चांगली कामगिरी करेल अशी कंपनीची अपेक्षा आहे.

Bajaj Chetak electric scooter

बजाजने ही स्कूटर १६ ऑक्टोबरला सादर केली होती. या स्कूटरची अंदाजे किंमत १ लाख २० हजार रुपयांच्या घरात असण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, कंपनीने १ लाख रुपयांपर्यंत किंमत ठेवली आहे.