गोपीनाथ मुंडे यांना द्या श्रद्धांजली!
भाजपचे नेते केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला असून त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्यांचे रुग्णालयात सकाळी 8 वाजता निधन झाले. लोकसभा निवडणुकीतील यशानंतर त्यांच्या कर्मभूमीत अर्थात बीडमधील परळीमध्ये आज संध्याकाळी गोपीनाथ मुंडेंचा नागरी सत्कार होणार होता. मात्र मुंडेंच्या अपघाताची बातमी कळल्यानंतर परळीमध्ये शोकाकुल वातावरण आहे.
Jun 3, 2014, 11:56 AM ISTपंतप्रधान मोदी यांची गोपीनाथ मुंडेना श्रध्दांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त केला आहे. मुंडे यांना पंतप्रधान मोदी यांनी श्रध्दांजली वाहीली. मुंडेच्या निधनाने देशाचे मोठे नुकसान झालेय, असं मोदींनी ट्विटरद्वारे श्रध्दांजली वाहली.
Jun 3, 2014, 09:51 AM ISTमहाराष्ट्राचा जनाधार असलेला नेता हरपला
भाजपचे नेते आणि केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झाले आहे. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांनी आठ वाजता अखेरचा श्वास घेतला. भीषण अपघातानंतर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा बळी घेतला. भाजपसह महाराष्ट्राला मोठा हादरा बसला आहे. मुंडे यांच्या निधनामुळे महाराष्ट्राने दिल्लीतील हक्काचा आवाज आणि जनाधार असलेला नेता हरपला, अशा भावना व्यक्त होत आहे.
Jun 3, 2014, 09:30 AM ISTगुलबर्गाजवळ अपघात, महाराष्ट्रातील १६ भाविक ठार
देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातलाय , अक्कलकोटहून कर्नाटकातील गुलबर्गाकडे जाणाऱ्या मिनी टेम्पोला कर्नाटक महामंडळाच्या बसने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात १६ जणांचा मृत्यू झाला तर तब्बल १३ जखमी झालेत.
Jun 2, 2014, 05:18 PM ISTवर्ध्यात खाजगी बसला आग, 5 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
जळगावहून नागपूरला येणाऱ्या बाबा ट्रॅव्हल्सच्या खाजगी बसला वर्धा जिल्ह्यातील तळेगाव जवळ अचानक आग लागली. या आगीत 5 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.
May 29, 2014, 11:47 AM ISTगोरख धाम एक्स्प्रेसला अपघात, 10 ठार
गोरखपूर एक्स्प्रेसला उत्तर प्रदेशातील गोरखपूरजवळ अपघात झाला आहे. या अपघातात 10 जण ठार झाले आहेत.
May 26, 2014, 12:55 PM IST`त्या दिवशी सलमान दारु प्यायलेला नव्हता`
‘हिट अॅन्ड रन’ प्रकरणात आणखी एका साक्षीदारानं दिलेल्या साक्षीमुळे अभिनेता सलमान खान याला दिलासा मिळालाय. घटनेच्या दिवशी सलमान नशेत नव्हता, अशी साक्ष सलमान खानच्या एका शेजाऱ्यानं दिलीय.
May 21, 2014, 08:52 AM ISTबोनी कपूर यांच्या गाडीला साताऱ्यात अपघात
साताऱ्यात बुधवारी रात्री सिनेनिर्माते बोनी कपूर यांच्या गाडीला अपघात झाला. या दुर्घटनेत ते जखमी झालेत. पण, त्यांना जास्त जखमा झालेल्या नाहीत.
May 15, 2014, 01:27 PM ISTमोबाईलनं घेतला तरुणाचा जीव
रेल्वेमार्गावर पडलेला आपला मोबाईल उचलण्याच्या नादात एक 18 वर्षीय तरुणानं आपला जीव गामवलाय.
May 9, 2014, 03:39 PM ISTबेशिस्त वाहतुकीमुळे राज्यात अपघातांचं प्रमाण वाढलं
राज्यात रस्ते अपघाताचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. बेशिस्त वाहतुकीला कुणीही लगाम लावतांना दिसत नाहीय.
May 9, 2014, 08:38 AM ISTरत्नागिरीत विचित्र अपघात, मुलीचा मृतदेह नेताना आई-वडील ठार
आपल्या मुलीच्या भवितव्याच्या काळजीपोटी तिला रत्नागिरीत परीक्षा देण्यासाठी नेत असताना संगमेश्वर येथे मुलीवरच काळाने घातला. यावरच काळ न थांबता मुलीचा मृतदेह घरी घेऊन जाणाऱ्या या मुलीच्या आई-वडीलांवरही मृत्यूने झडप टाकली. रत्नागिरीतील विचित्र अपघाताने खेडमधील कुटुंबच उद्धस्त झालंय.
May 8, 2014, 04:12 PM ISTकोकण रेल्वे अपघात, मृतांची आणि जखमींची नावं
गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी रेल्वे अपघात झाला त्या ठिकाणाला भेट दिलीय. अपघातग्रस्तांना राज्य सरकारकडून योग्य प्रकारची मदत केली जाईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.
May 4, 2014, 06:08 PM ISTरूळ तुटल्याने दिवा-सावंतवाडी पॅसेंजर घसरली?
दिवा-सावंतवाडी पॅसेंजर अपघात रेल्वे रूळ तुटल्याने झाला असावा, असं रायगड पोलिसांनी म्हटलं आहे. या अपघातात 15 जण ठार झाले आहेत, तर 96 जण जखमी आहेत.
May 4, 2014, 02:43 PM ISTदिवा-सावंतवाडी पॅसेंजर अपघात, मृतांची संख्या वाढली
दिवा-सावंवाडी पॅसेंजरला झालेल्या अपघातातील मृतांचा आकडा वाढला आहे. मृतांचा आकडा 12 वर गेल्याचं सांगण्यात येतंय.
May 4, 2014, 01:24 PM ISTदिवा-सावंतवाडी पॅसेंजरला भीषण अपघात
रायगड जिल्ह्यात दिवा-रोहा पॅसेंजरला भीषण अपघात झाला आहे. यात आतापर्यंत चार जण ठार झाले असल्याचं सांगण्यात येतंय.
May 4, 2014, 11:37 AM IST