दहावीचा निरोप घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गाडीने उडविले
संकेत आणि मुज्जफर. शनिवारी सकाळी दहावीच्या निरोप समारंभसाठी आनंदात संकेत आणि मुझफ्फर निघाले. हसतखेळत जात असताना त्रिमूर्ती चौकात त्यांना एका मोपेडचा धक्का लागला. ट्रकखाली चिरडलं गेल्यानं दोघांचा दुर्दैवी अंत झाला. घटनास्थळापासून काही अंतरावर पोलीस चौकी असूनही वाहतूक नियंत्रित करण्यासाठी या ठिकाणी कधीही पोलीस नसतात. दरम्यान, परभणीतील विचित्र अपघातात एकाचा मृत्यू झाला.
Feb 23, 2014, 06:39 PM ISTअरे बापरे..पुण्यात बोअरवेलमध्ये पडला दोन वर्षांचा चिमुरडा
पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील टाकळीहाजी इथं दोन वर्षांचा मुलगा बोअरवेलमध्ये पडला. शुभम मोरे असं या चिमुकल्याचं नाव आहे. एका शेतात शुभमचे वडील ऊसतोडणीसाठी आले होते. त्याचवेळी खेळता खेळता शुभम शेतातल्या दीडशे ते दोनशे फूट खोल उघड्या बोअरवेलमध्ये पडला.
Feb 23, 2014, 06:05 PM ISTपुणे-नाशिक महामार्गावर अपघात, तीन ठार
पुणे-नाशिक महामार्गावर चाकणजवळ वाशी येथे आज पहाटे कार अपघातात तीन जण ठार झाले आहेत. या अपघातात पिंपरी-चिंचवडचे माजी उपमहापौर शरद बोराडे यांचा मुलगा प्रीतम बोराडे याच्यादेखील मृतांमध्ये समावेश आहे.
Feb 22, 2014, 06:21 PM ISTपुणे-नाशिक महामार्गावर अपघात, ७ ठार
पुणे महामार्गावर रात्री दोन वाजेच्या सुमारास बोटा शिवारात ट्रक आणि बोलेरो पिक-अपमध्ये भीषण अपघातात ७ जण मृत्युमुखी पडले तर ९ जण जख्मी झाले आहेत. मृतांत ३ लहान मुलांचा समावेश आहे.
Feb 17, 2014, 03:13 PM ISTचिखली येथील अपघातात ४ ठार
अमरावतीवरून जळगावला सरपंच परिषदेसाठी जाणा-या स्कोर्पिओ गाडीला अपघात झालाय. त्यात ४ जण जागीच ठार तर ४ जण गंभीर जखमी झालेत. आज पहाटे साडेतीन वाजता हा अपघात झाला.
Feb 15, 2014, 01:13 PM ISTमुंबई-गोवा मार्गावरील अपघातात ३५ जण जखमी,१६ गंभीर
मुंबई-गोवा महामार्गावर भोस्ते घाटात दोन ट्रकची समोरासमोर टक्कर झालेल्या धडकेत ३५ जण जखमी झालेत. त्यामधील १६ जण गंभीर आहेत. सकाळी पावणे पाचला हा अपघात झालाय.
Feb 11, 2014, 10:02 AM ISTटेंपो दरीत कोसळून अपघात, ९ गंभीर
खेड-दापोली रस्त्यावर कुवे घाटात टेंपो दरीत कोसळलाय. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं टेंपो दरीत कोसळला. टेंपोमध्ये १४ कंत्राटी कामगार प्रवास करत होते. चौदापैकी ९ कामगार गंभीर जखमी आहेत. जखमींवर दापोलीतल्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरुयात.
Feb 8, 2014, 10:59 AM IST"गुत्थी"च्या कारने दिली ऑल्टोला धडक, ४ जखमी
कॉमेडी नाइट्स विथ कपिल या शोमधून बाहेर पडलेली गुत्थी म्हणजे सुनील ग्रोवर यांच्या बीएमडब्ल्यू कारने एका ऑल्टो कारला धडक दिल्याने झालेल्या अपघातात ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.
Feb 7, 2014, 08:10 PM ISTनेपाळमधील बस अपघातात १४ ठार
पल्पा जिल्ह्यातील पर्वत भागात आज गुरुवारी सकाळी भालूकोला नदीमध्ये बस नदीत कोसळल्याने झालेल्या अपघातात १४ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात सात जण जखमी झाले आहेत.
Feb 6, 2014, 04:29 PM ISTखालापूर इमॅजिका थीम पार्कमध्ये अपघात, चार महिला जखमी
रायगड जिल्ह्यातल्या खालापूरच्या इमॅजिका थीम पार्कमध्ये अपघात झालाय. या अपघातात चार महिला जखमी असून यातली एक महिला गंभीर जखमी आहे.
Feb 5, 2014, 06:27 PM ISTबस - कार - कंटेनर - टेम्पोला अपघात, १० ठार
सातारा - पुणे रस्त्यावर एक विचित्र अपघात झालाय. एका गाडीला झालेल्या अपघातामुळे मागच्या गाड्यांनीह एकमेकांना धडक दिली आणि अपघातात तब्बल १० जणांना आपले प्राण गमवावे लागलेत तर ३६ हून अधिक जण जखमी झालेत. मृतांमध्ये तीन पुरूष आणि सात महिलांचा समावेश आहे.
Feb 4, 2014, 12:22 PM ISTऑईल टँकरसह दोन गाड्या जळून खाक, आठ ठार
मुंबई-अहमदाबाद हायवेवर झालेल्या विचित्र अपघातात आठ जण ठार तर १० जण जखमी झाले असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
Jan 29, 2014, 09:44 AM ISTनागपूर अँब्युलन्स-बस अपघात ६ ठार
नागपूर-अमरावती रस्त्यावर खुर्सापूर येथे सोमवारी मध्यरात्री रुग्णाला घेवून जात असलेल्या रुग्णवाहिका आणि खासगी बसमध्ये झालेल्या अपघातात सहा जण ठार झालेत. या अपघातात रुग्णवाहिकेच्या चालकासह एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला.
Jan 28, 2014, 10:12 AM ISTपायही गेले आणि जोडीदाराचा हातही सुटला!
मोनिका मोरेसारखी अनेक उदाहरणं या मुंबईत मिळतील... ठाण्यातले प्रशांत महाजन हे त्यापैकीच एक... १९९९ मधला तो दिवस आठवला की अजूनही त्यांचा थरकाप उडतो... एका अपघातानं त्यांचं अख्खं आयुष्य उध्वस्त केलं... आणि हे सगळं घडलं त्यांच्या लग्नाच्या आदल्या दिवशी.
Jan 16, 2014, 10:07 PM ISTखंबाटकी घाटातील अपघातात ९ ठार, ५ जखमी
बंगलोर हायवेवर साताऱ्याकडून पुण्याकडे जात असलेल्या टेम्पो क्रुझरला अपघात झाला. खंबाटकी घाटात झालेल्या या अपघातात ९ ठार तर ५ जण गंभीर जखमी झालेत.
Jan 14, 2014, 08:21 AM IST