accident

बुलढाणा: अपघातात ५ विद्यार्थीनी ठार

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर वाहुलगाव फाटयाजवळ काटी या गावावारून मलकापूरला येत असलेल्या बसला समोरून येणा-या ट्रकनं चिरडलंय. या भीषण अपघातात ५ विद्यार्थिनी जागीच ठार झाल्यायत. तर 20 ते 25 विद्यार्थी जखमी झालेत. सकाळी सात वाजता हा अपघात झालाय.

Jan 10, 2014, 02:47 PM IST

ओव्हरटेकच्या नादात एसटीची ट्रकला धडक, चार ठार

माळशेज घाटात दरीत एसटी कोसळून झालेल्या अपघाताला दोन दिवसही उलटले नाहीत तोच अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूरजवळ आज पुन्हा एक एसटी आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झालाय.

Jan 5, 2014, 02:39 PM IST

नाशिकजवळ अपघात ३ ठार

वणी महामार्गावर पहाटे झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले आहेत. क्वालिस गाडीला ट्रकला दिलेल्या धडकेत तीन जण ठार तर तीन जण जखमी झाले आहेत.

Jan 2, 2014, 05:48 PM IST

एका अपघातानं केला देशी कट्ट्यांच्या तस्करीचा भांडाफोड

एका अपघातानं देशी तस्करींचा भांडाफोड केलाय. अमरावतीजवळ ही घटना घडलीय. मुख्य म्हणजे, देशी कट्ट्यांच्या या तस्करीत एका जोडप्याला अटक करण्यात आलीय.

Dec 24, 2013, 07:01 PM IST

सावंतवाडीतील कार अपघातात ५ ठार, दोन जखमी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी जवळील मळगाव येथे झालेल्या भीषण कार अपघातात पाच जण ठार झाले. कारचा टायर फुटल्याने ती दरीत कोसळली. या अपघातात बालकांसह पाच जण ठार झालेत. तर दोघे जखमी झालेत.

Dec 21, 2013, 11:21 PM IST

सिंगापुरात भारतीय तरुणाचा घात की अपघात?

सिंगापूरमध्ये ‘छोटा भारत’ म्हणून ओळखला जाणारा हॅम्पशायर हा रस्ता आणि रेस कोर्स रस्ता या भागात एका भारतीय मजुराचा बसच्या धडकेत मृत्यू झाला. या अपघातानंतर शहरात उसळलेल्या हिंसाचारप्रकरणी २४ भारतीयांसह २७ दक्षिण आशियायी मजुरांना अटक करण्यात आली आहे. तसेच या अटकेत एक स्थानिक आणि दोन बांगलादेशी मजुरांचादेखील समावेश आहे. हा अपघात झाल्यानंतर रात्री तिथे जमलेल्या ४०० जणांच्या जमावाने खाजगी बसची नासधूस केली.

Dec 10, 2013, 05:46 PM IST

शालेय सहलीच्या बसला अपघात, सात ठार

तुळजापुरात दोन बसच्या धडकेत ७ ठार आणि १६ जण जखमी झाल्याची घटना घडलीय..मृतांमध्ये ६ विद्यार्थी आणि एका ड्रायव्हरचा समावेश आहे..तुळजापूर-सोलापूर रोडवर ही घटना घडलीय...

Dec 7, 2013, 09:38 AM IST

पाहा प्लॅटफॉर्म आणि रेल्वेमधील महिलेचा जगण्यासाठीचा संघर्ष

कानपूर रेल्वे स्थानकावर झालेल्या अपघातात एका महिलेला आपले प्राण गमवावे लागले आहे. लखनऊ-झांशी इंटरसिटी एक्सप्रेसनं कानपूर स्थानकावर उतरत असताना हा अपघात झाला.

Dec 2, 2013, 04:52 PM IST

व्हील रॉड तुटला... रस्त्यावरच पलटली एसटी, ८ जखमी

रत्नागिरी पावसजवळच्या वायंगणीमध्ये एसटी बस पलटी झालीय. या गाडीमध्ये बहुतेक शाळकरी मुले होती. त्यातली काही किरकोळ जखमी आहेत. मात्र, ८ प्रवासी गंभीर आहेत.

Dec 2, 2013, 01:53 PM IST

रेल्वेखाली तीन जणांचा चिरडून मृत्यू

सांगली जिल्ह्यात मिरजजवळ आज सकाळी रेल्वे अपघातात तिघांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये दोन महिला आणि एका पुरूषाचा समावेश आहे.

Nov 27, 2013, 05:48 PM IST

सिंधुदुर्गात दोन एसटींची धडक होऊन अपघात

सिंधुदुर्गमध्ये दोन एसटींची समोरासमोर धडक झाल्यानं भीषण अपघात झालाय. या अपघातात ३५ जण जखमी झाले असून १० जणांची प्रकृती गंभीर आहे.

Nov 22, 2013, 11:45 AM IST

कुंभार्ली घाटात बसचा अपघात; तीन ठार

रत्नागिरीत मिनी बसला भीषण अपघात झालाय. रत्नागिरीतल्या कुंभार्ली घाटात ही मिनी बस कोसळली. यात बसमधील तीन जण ठार तर सात जण जखमी झालेत.

Nov 18, 2013, 07:51 AM IST

ट्रक अपघातात २१ ठार, तीन बालकांचा समावेश

गुलबर्गामधून कोकणात सावंतवाडीकडे येणारा ट्रक बेळगाव-बागलकोट मार्गावर पलटल्याने २१ जणांचा मृत्यू झाला. ट्रकमध्ये कामगारांचा समावेश होता. मृतांतमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. हलकीजवळ आज पहाटे साडेपाच वाजता हा अपघात झाला.

Nov 16, 2013, 11:32 AM IST

वरळीत दोन वाहनांमध्ये भीषण अपघात, ४ गंभीर

मुंबईतल्या वरळी परिसरात दोन वाहनांचा भीषण अपघात झाला. फॅबिआ गाडीनं मारुती सुझुकीला दिलेल्या धडकेत चौघं जण गंभीर जखमी झालेत. रात्री १२च्या सुमारास ही घटना घडलीय.

Nov 6, 2013, 08:47 AM IST

लोणावळा भीषण अपघातात तीन महिला ३ ठार, सात जखमी

लोणावळा एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झालाय. या अपघातात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी आहेत.

Nov 5, 2013, 01:07 PM IST